विरोधी पक्ष हा लोकशाहीचा आत्मा आहे.

Share

प्रतिनिधी :मिलन शहा


मुंबई :लोकशाहीच्या निकोप वाढीसाठी एक सक्षम आणि प्रबळ विरोधी पक्षनेता अनिवार्य आहे.
.मुख्यमंत्री हा सरकारचा चेहरा असतो, तर विरोधी पक्षनेता हा जनतेचा आवाज असतो.महाराष्ट्रात नव्या सरकारला सात महिने उलटून गेले, तरी आजतागायत विधानसभेला विरोधी पक्षनेता नाही. ही केवळ घटनात्मक पोकळी नाही, तर आपल्या संसदीय लोकशाहीसाठी घातक बाब आहे.2014 पासून 2024 पर्यंत लोकसभेतही विरोधी पक्षनेता नव्हता. आज तीच पद्धत महाराष्ट्रात पुन्हा अमलात आणली जात आहे.विरोधकांचा आवाज क्षीण करून मनमानी कायदे व धोरणं मंजूर करण्याचा हा एक डाव आहे. मी भाजपला आठवण करून देते की, 1980 मध्ये काँग्रेस पक्षाने विरोधकांच्या कमी जागा असूनही दिलदारपणा दाखवत विरोधी पक्षनेत्याचं पद दिलं होतं. त्यामुळे, आत्ताच्या सरकारनेही मनाचा मोठेपणा दाखवून राज्यात विरोधी पक्षनेत्याचं पद तातडीने द्यावं.ही नैतिकतेची बाब आहे. जनतेला सुदृढ, पारदर्शक आणि जबाबदार लोकशाही हवी आहे आणि त्यासाठी विरोधी पक्षनेता असणं अत्यावश्यक आहे.-खासदार वर्षा गायकवाड, अध्यक्षा, मुंबई काँग्रेस.


Share

One thought on “विरोधी पक्ष हा लोकशाहीचा आत्मा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *