
एसएमएस-प्रतिनिधी -उत्कर्ष बोर्ले
मुंबई : चिफ ऑफिसर विश्वनाथ पांचाळ यांना आदर्श राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी पुरस्कार. स्वामी विवेकानंद हायस्कूल नेहरू नगर कुर्ला या ठिकाणी एनसीसीच्या माध्यमातून एकता, शिस्त ,देशसेवा, नेतृत्व गुण रुजवण्या साठी तसेच देशासाठी आदर्श नागरिक ,सेवाभावी कार्यकर्ते व भविष्यातील सैनिक घडवण्याच्या सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय कार्याची घेऊन असोसिएट एनसीसी ऑफिसर वेल्फेअर बोर्ड महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी,गांधी बाल मंदिर हायस्कूल येथील तीन महाराष्ट्र बटालियनचे चिफ ऑफिसर श्री विश्वनाथ पांचाळ यांना ब्रिगेडियर शिरीष ढोबळे व कॅप्टन मनोज भामरे सर तसेच प्राचार्य सुमन सिंह , असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद जगताप सर , उपाध्यक्ष विदुला साठे यांच्या हस्ते बेस्ट एनसीसी ऑफिसर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. हा सन्मान गांधी बालमंदिर शाळेचा तसेच सर्व आजी-माजी एनसीसी कॅडेट यांचा सन्मान आहे. या सन्मानाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री अनिल पांचाळ सर, पर्यवेक्षक श्री रवींद्र खोंडे सर तसेच शाळेचे सर्व सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक यांनी सरांचे अभिनंदन केलेले आहे.
अभिनंदन