वैशाली महाडिक सय्यद यांना जागृत आदर्श समाजसेविका पुरस्कार!!

Share

जागृत आदर्श समाजसेविका पुरस्कार प्राप्तकरती-वैशाली महाडिक सय्यद.

प्रतिनिधी :उत्कर्ष बोर्ले

मुंबई :“जागृत महाराष्ट्र न्यूज” तर्फे वैशाली महाडिक सय्यद, संस्थापक सचिव सफल विकास वेलफेअर सोसायटी यांना सामाजिक क्षेत्रात मागील 23 वर्षांपासून अविरत केलेल्या सामाजिक विशेष करून एकल महिलांच्या प्रगती साठी केलेल्या  कार्याची दखल घेत जागृत आदर्श समाजसेविका पुरस्कार  गुरुवार दिनांक 29 मे 2025 रोजी संध्याकाळी 6 वाजता सीडी बर्फीवाला रोड, झालवाद नगर, जुहू लेन, यादव नगर, अंधेरी पश्चिम, मुंबई. येथेप्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर  यांच्या  हस्ते प्रधान करण्यात येणार आहे.तसेच पत्रकारिता, शैक्षणिक व इतर क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणार्यांचा ही या प्रसंगी गौरव करण्यात येणार आहे. वैशाली महाडिक सय्यद यांचे सर्व थरातून कौतक होत आहे.

मला मिळालेला हा सन्मान हा त्या सर्वांचा आहे ज्यांच्या सोबत मला कार्य करण्याची  संधी मिळाली तसेच संस्थेचे सर्व कार्यकर्ते, साथी हितचिंतक आणि माझी मुलगी ईशा ची ही मोलाची साथ मिळाली. मी हा पुरस्कार त्या सर्वांना अर्पण करते तसेच जागृत महाराष्ट्र न्यूज चे संपादक अमोल भालेराव यांचे विशेष आभार तसेच त्यांच्या न्यूज चॅनेल ला माझ्या शुभेच्छा- जागृत आदर्श समाजसेविका पुरस्कार प्राप्तकरती-वैशाली महाडिक सय्यद.


Share

6 thoughts on “वैशाली महाडिक सय्यद यांना जागृत आदर्श समाजसेविका पुरस्कार!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *