एसएमएस -प्रतिनिधी-कृष्णा वाघमारे
मुंबई : देशभरात सुरू असलेल्या वोट चोरीविरोधातील आंदोलनाला आता मुंबईत गती मिळणार आहे. काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाचा भाग म्हणून महाविकास आघाडी व इतर विरोधी पक्षांच्या वतीने शनिवार, १ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता मेट्रो सिनेमा ते फॅशन स्ट्रीट, मुंबई येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप करत हा मोर्चा लोकशाही व मतदार हक्काच्या संरक्षणासाठी काढण्यात येणार आहे. या मोर्चात काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते आणि सहयोगी पक्षांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
या संदर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील आणि सरचिटणीस ॲड. संदेश कोंडविलकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, “लोकशाही वाचवण्यासाठी आणि मतदारांचा आवाज बुलंद करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने या मोर्चात सहभागी व्हावे.”
कोणतेही सरकार सत्तेत असो सामान्य मतदार जनतेला कसलाच थारा नाही.जनतेची परिस्थिती ” जैसे थे ” !…
Govt should act