शहीदांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ₹१लाखाची मदत..

Share

प्रतिनिधी : वैशाली महाडिक

मुंबई : उत्तर भारतीय संघाने वांद्रे पूर्व येथे ७९वां स्वातंत्र्यदिन मोठ्या थाटामाटात साजरा केला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्या शूर सुपुत्रांना श्रद्धांजली वाहताना, त्यांच्या कुटुंबियांना संघाचे अध्यक्ष संतोष आरएन सिंह यांनी प्रत्येकी ₹१ लाख रुपयांची सन्मान निधी प्रदान केली.  स्वातंत्र्यदिनी वांद्रे पूर्व येथील उत्तर भारतीय संघ भवन येथे एका भव्य समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये उत्तर भारतीय समाजातील मान्यवर, विश्वस्त, पदाधिकारी, सदस्य आणि मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. भारत-पाकिस्तान युद्धात बांगलादेशमध्ये शहीद झालेले लांस नाईक शांताराम मोरे यांच्या पत्नी उज्ज्वला मोरे, पठाणकोटमध्ये शहीद झालेले हवालदार सूर्यकांत तेलंगे यांच्या पत्नी मनीषा तेलंगे, कुपवाडा येथे ऑपरेशन रक्षक दरम्यान शहीद झालेले कॅप्टन विष्णू गोरे यांच्या आई अनुराधा गोरे, पुलवामा येथे शहीद झालेले मेजर यशिन रमेश आचार्य यांच्या आई ग्रेस रमेश आचार्य आणि शहीद अग्निवीर मुरली श्रीराम नाईक यांच्या आई ज्योतिबाई नाईक यांना संतोष सिंग यांच्या हस्ते प्रत्येकी ₹१ लाख रुपयांचा सन्मान निधी प्रदान करण्यात आला.

       समारंभाचे मुख्य आयोजक आणि संघाचे अध्यक्ष संतोष आरएन सिंग म्हणाले की, शहीदांची अमर इतिहास नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शेवटी, उपस्थित सर्व लोकांनी त्यांच्या आवडीचे स्वादिष्ट जेवणचे आस्वाद घेतले.


Share

4 thoughts on “शहीदांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ₹१लाखाची मदत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *