
प्रतिनिधी : वैशाली महाडिक
मुंबई, ता २४(प्रतिनिधी )विलेपार्ले पूर्व येथील पार्ले टिळक विद्यालय तसेच दि. ग्रेटर मुंबई एज्युकेशन सोसायटी शाळा व महाविद्यालयाच्या प्रवेश द्वाराजवळच गतिरोधक एक बाजूने क्षीण झाल्याने विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात. या शाळेच्या प्रवेशद्वारा लगत असलेले गतिरोधक
पूर्णपणे झाला असून या एक बाजूने बरीच दुचाकी व चार चाकी वाहने अगदी वेगाने धावत असून बाजूला असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांचा व पालकांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा जीव धोक्यात असून याबाबत पालिकेच्या के/पूर्व विभागातील सहाय्यक अभियंता परिरक्षण खाते अधिकाऱ्यांना स्थानिक नागरिकांनी कित्येकदा तोंडी आणि लेखी पत्र पाठवून कळविले असताना देखील येथे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते असे आरोप त्यांनी केले आहे.
चौकट :या ठिकाणी दोन शाळा असून शेकडो विद्यार्थ्यांचे या ठिकाणावरून ये जा असते तसेच एका शाळेचे प्रवेशद्वार या गतिरोधक समोरच असल्याने वाहनांची ये जा वेगाने होत असल्यामुळे अपघाताची भीती सतत पालकांना सतावत आहे.
कोट :शाळेत ने आन करताना वेगाने येणाऱ्या दुचाकीन्ची भीती वाटते कारण या दुचाकी तसेच हा रस्ता एकेरी असून ही दोन्ही बाजूने उलट सुलट दुचाकी वेगाने ये जा करतात त्यामुळे लक्ष विचलित होतो आणि अपघात घडण्याची भीती वाटते. काही वेळी वाहतूक कोंडी आणि दुचाकी स्वार कट मारून जातात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच या बाबत तक्रार करण्यासाठी गेलो असता सब इंजिनीयर विशाल कोकाटे यांनी उद्धट पणे मग हे काढून टाकू असं बोलले..-रहिवासी -उत्कर्ष बोर्ले.
येथे नवीन रस्ते बनवणार आहोत त्या वेळी बनवू अथवा हटवून टाकू -विशाल कोकाटे:-सब इंजिनीयर, पालिका
ज़र अपघात झाला तर महानगर पालिक va कॉन्ट्रैक्टवर गुनाह दख़ल करवा लोकनी
Bmc plz do it
Is bmc working?