
एसएमएस-प्रतिनिधी -मिलन शहा
मुंबई : चांदिवली विधानसभा मतदारसंघातील संघर्ष नगर, वॉर्ड क्रमांक १५७ येथील शिंदेगटाच्या डॉ. सरिता म्हस्के आणि डॉ. रविंद्र म्हस्के यांनी आज मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात अधिकृत प्रवेश केला. पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांनी त्यांच्या मनगटावर शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले.
यावेळी शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर तसेच विभागप्रमुख सोमनाथ सांगळे उपस्थित होते. या प्रवेशामुळे चांदिवली परिसरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
Incoming