
प्रतिनिधी:सुरेश बोर्ले
मुंबई,एक म्हण आहे शेठ का माल,सरका बाल!याचा अर्थ असा होतो की,मालकाच्या दुकानात नोकर कामाला असतो, तो मालकाच्या,वस्तूंची परवा करित् नाही,कशीही फेका फेक करतो.आपटतो नुकसान कुणाचं होणार मालकच?असाच काहीं घडतंय महाराष्ट्राच्या राज कारणा मध्ये.शिवसेनेच्या फाटा फुटी नंतर,शिंदे सरकार अस्थित्वात आल्!ह्या कुरघोडीत आपण श्रेष्ठ आहोत,आपला सरकार जबरदस्त काम करीत आहे हे दर्शविण्याव्यासाठी,ह्या सरकारने,योजनांचा धडाकाच लावलेला आहे.आली योजना,कर पास कोटींच्या कोटी रुपये.अर काय हे?एक नागरिक म्हणून,लोकांना हक्क आहे,दर्शवण्याचा.की,तुमच्या आपसातील कुरघोडी मुळे,जनतेच्या पैशांची उधळण होत आहे. याची आपण आवर्जून नोंद घ्यावी.तुमच्या कोणाच्या खिशातून हा पैसा जात नाही!शेवटी भुर्दंड हा जनतेलाच भोगावा लागणार आहे.लोकशाही हे लोकांनी लोकांसाठी,चालवलेला राज्य आहे! हे आपण विसरता?म्हणून तुम्हाला आमची तिजोरी,रिकामी करायचा हक्क लोकांनी ,लोकशाहीने दिलेला नाही.हे आपण आवर्जून लक्षात ठेवावे.महागाईने आसमानता गाठलीय,देशावर अनेक कोटींची कर्झे आहेत,ती कोण जनताच फेडणार?तुम्ही नाही!हे सगळं जनता जाणून आहे.आमचे प्रतिनिधी गेलेत अमेरिकेला?अमेरिकेने भरघोस मदत केली हे,एकिवत नाही, पण पाकिस्तानला भरघोस मदत केली आहे,मग ती आर्थिक असो शस्त्र असो,इतर काही बाबत असो पाकिस्तानचा संपूर्ण आर्थिक डोलारा,हा अमेरिकेच्या मदतीने होत असतो. हे जग जाहीर आहे.भारताने जरा देखील पाकिस्तान विरोधात आवाज काढला की,अमेरिकन धमकी,आलीच समजा!उद्या जर का,महायुद्ध जाल तर अमेरिका आपल्या बाजूने उभी राहणार आहे का?हे जनतेला माहित आहे.हा बनाव आहे.असो!आपण मुख्यमंत्री आहात,तुफान कामे करा पण आर्थिक बाब येईल,तेव्हा मात्र,जनतेचा विचार करा!कारण जनतेला,निवृती नंतर आपल्या सारखी सुविधा मिळणार नाही,हे त्यांना माहीत आहे.तरी पण तुमच्यावर विश्वास ठेऊन,तुम्हाला निवडून दिलेलं आहे.हे आपण आपल्या जनतेचे उपकार विसरू नये!हाच येथे मांडण्याचा जनतेचा प्रयत्न आहे. एक तरी प्रकल्प महाराष्ट्रात, थांबला का?कुठे गेला?कुठल्या राज्याचं भल होतय?बेकारी किती वाढते आहे, सगळे तुम्हाला माहित आहे. लोकांना माहिती आहे. त्यामुळे हे मांडणं अतिशय जरुरीचा आहे. लोकांनाही कळलं पाहिजे की महाराष्ट्रात काय चाललंय?