
अध्यक्ष नौशाद शिकालगार उपस्थितांशी संवाद करताना.
प्रतिनिधी :वैशाली महाडिक
मुंबई : शिकलगार सहकारी पतपेढी मर्यादित चा ४८ वा वर्धापन दिन नुकताच संस्थेचे मुख्य कार्यालय कुर्ला पूर्व येथे मोठ्या उत्साहात पार पडला. संस्थेचे अध्यक्ष श्री नौशाद शिकलगार यांच्या हस्ते पतसंस्थेचे www.shikalgarpatpedhi.com या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळेस बोलताना श्री नौशाद शिकलगार यांनी संस्थेचे सभासद, हितचिंतक, कर्मचारी वर्ग व संचालक यांचे संस्थेला इथपर्यंत आणण्यात सहकार्य केल्याबद्दल आभार मानले व संस्था लवकरच ५० कोटींचा टप्पा पार करेल असा विश्वास व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की यापुढे संस्थेच्या प्रत्येक कर्जधारकाचा व सभासदाचा विमा उतरवला जाईल. जेणेकरून सभासदाच्या पश्चात त्याच्या घरच्यांना कर्ज फेडीचा त्रास होणार नाही.
यावेळेस संस्थेच्या उपाध्यक्षा सौ शमा शिकलगार, सर्व संचालक, कर्मचारी वर्ग व सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री साजीम मुलाणी यांनी केले
Good progress