प्रतिनिधी : सुरेश बोर्ले
मुंबई :अलीबाबा आणि ४० चोरांची गोष्ट बालपणी अनेकवेळा वाचली. आहे. त्यामधील वर्णने आजही मनात टिकून आहे.अलिबाबाला मिळालेला खजिना व ४० चोरांच आचरण, अश्याच प्रकारच प्रत्यय आता आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणात पहायला मिळत आहे. स्व.बाळा साहेबांच्या शिवसेनेला भगदाड पाडून ४० आमदारांसह या ठाणेकरांनी आपला गट प्रति शिवसेना म्हणून स्थापला.त्याचं चिन्हही ढापल. असा त्यांनी आपला अलीबाबा साकारला.ह्या अलिबाबांच्या गुहेचा खजिना म्हणजे! “पन्नास खोके एकदम ओके” अशी विरोधक नेहमीच खिल्ली उडवत असतात.ह्या ४०जणांचे काहींचे रंग आता सरड्या प्रमाणे बदलू लागलेले आहेत.तर त्यातील दोघांनी तर कहर केलेला आहे. आ.संजय गायकवाड! ह्यांचा पाय कांहीं प्रकरणात खोलात चाललेला असताना,त्यांनी आमदार निवासात,जेवण्याच्या तक्रारीवरन तेथील उपहारगृह्याच्या वाढपी कामगाराला टॉवेल व अंगात बनियान घालून मारहाण केली व व्यवस्थापकाला धमकावले.तर दुसरे आ.संजय शिरसाट ह्यांच आपल्या पाळीव कुत्र्यासहित वामकुक्षी घेताना,पलंगावर
हातात श्वेत धूम्र लंब दांडिका अर्थात सिगारेटचा झुरका सोडीत असताना व त्यांच्या पलंगाशेजारीच ठेलेल्या बॅगेत नोटांची बंडले रचलेली दिसत आहेत. अशा दोन्ही आमदारांची स्टिंग ऑपरेशन करून,घेतलेल्या छायाचित्रकरांना २१तोफांची सलामी.तर मराठी मोर्च्यात सामील झालेल्या आमदर
प्रताप सरनाईकांना तेथून पन्नास खोके आरोळीने पळ काढावा लागला होता. त्यांच्या आमदारांच्या अशा कृत्याने विरोधकांना आयतेच कोलीत हातात मिळालेले आहे.तर अलिबाबांची फार मोठी पंचायत झालेली आहे.स्व.आनंद दिघे साहेबांना गुरू मानणारे हे महाशय गुरुपौर्णिमेलाच दिल्ली दरबारी गेल्याने,त्यांच्या विषयही वावड्या उठत आहेत.त्यामुळे अलिबाबा चिंतेत आहे. विरोधकही त्यांची खिल्ली उडवित आहेत.आधीच ह्या आमदारांच्या अनेक कृत्याने परेशान असलेल्या, पुष्पाजीननी सगळ्या आमदारांना!नागपूरकरांच्या आदेशाने!समज दिलेली आहे.त्यामध्ये ठाकरे बंधूंचे मिलन हा ताण त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो.एकंदरीत मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरून पाणउतारा झाल्यावर,त्यांची गोची झालेली आहे.एकंदरीत पुढची राजकारणी वाटचाल ही त्यांची कठीण दिसत आहे.
काय खरच?