
प्रतिनिधी :केतन खेडेकर
मुंबई,दक्षिण मुंबई युवासेना व युवा व्हिजन संस्थेच्या माध्यमातून विभागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी श्री गणेश विमा कवचचे वितरण नुकतेच गिरगांव येथील श्री बेंकवेट हॉल येथे माजी विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या वतीने करण्यात आले. नोंदणीकृत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी आयोजित केलेल्या वितरण समारंभ प्रसंगी विभागातील २५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना प्रत्येकी ५ लाख म्हणजे एकूण १ करोड २५ लाख रुपयांचा श्री. गणेश विमा कवचाचे वितरण करण्यात आले. दि ओरिएंटल इन्शुरन्स कं. लि. च्या सहकार्याने वितरण केलेल्या या विमा कवच मुळे गणेशोत्सव मंडळाच्या ५० क्रियाशील कार्यकर्त्यांचा रू. १ ते ५ लाख पर्यंतचा अपघात विमा तसेच मंडप व श्री. गणेशाची आभुषणे, अलंकार या सर्व बाबींचा विम्यामध्ये लाभ मिळणार आहे. या प्रसंगी विधानसभा समन्वयक सुनील देसाई, संतोष विर, शाखा समन्वयक निलेश देवळेकर, अभिजित गुरव, शाखा संघटक माधुरी पेंढारी, प्रथमेष सकपाळ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन युवासेना सहसचिव प्रथमेश सकपाळ यांनी केले होते.