संदीप देशपांडेंची “इंदुरी चाट”..!

Share


प्रतिनिधी : सुरेश बोर्ले

मुंबई : मनसे नेते व मुख्य प्रवक्ते मा.संदीप देशपांडे ह्यांच्या
इंदुरी चाट ह्या हॉटेलची चर्चा सध्या बरीच रंगत आहे.खास करून भाजपा नेत्यांनी ह्याचे तोंडसुख भरपूर घेतले आहे. कारण मनसे म्हटले की मराठी मुद्दा प्रथम!मग तुम्ही एप्रिल महिन्यात दादर येथे इंदुरी चाट नावाने,परप्रांतीय पदार्थांचे हॉटेल मोठ्या दिमाखात काढताय.एका बाजूला हिंदी व इतर भाषांना प्रखर विरोध करायचा,आपली मुले कॉन्व्हेन्ट शाळेत शिकवायची!हा काय प्रकार आहे.अशी टीका भाजपा नेत्यांनी केलेली आहे.ही टीका अगदी योग्य आहे,जी मराठी जनतेला योग्य वाटते. मग मराठी,मराठीचा बोगस नारा का लावता? ह्याची नोंद मनसे पक्ष प्रमुखांनी नक्की घ्यावी.ही मराठी भूमिपुत्रांची हाक आहे.देशपांडे ह्यांनी ह्या खुलाशाचे खंडन करताना,
इडली डोसा हे पदार्थ पण पर प्रांतीय आहेत पण सगळेच विकतात! मग इंदोरी चाट का नको? भाजपा असाही आरोप आहे की ह्या हॉटेल मध्ये कामगार परप्रांतीय आहेत.ते तुम्हाला चालतात?मग खळ खट्याळ कश्यासाठी?ह्यावर देशपांडे ह्यांनी खुलासा केला की, भाजपाने माझ्याकडे कामासाठी यावे!₹१८हजार पगार देतो.!! सारार्वांशी एकच मराठी जनतेला वाटते,ते म्हणजे ह्या हॉटेलचे नाव आपण चाट भंडार,चाट गृह ठेऊ शकला असता!निवडणुका जवळ येत असताना,आपण विरोधकांच्या हातात आयत कोलीत देऊन चर्चेला उधाण आणायचे,ह्याने अनेक लोक घुमजाव ही होऊ शकतात!ही भूमिपुत्रांची विचारधाराआहे.मनसेने कितीही खुलासा केला तरी हे पटण्या सारखे नाही.याची नोंद घ्यावी!चुकीला माफी नाही!हा मराठी जनमताच कौल आहे.


Share

2 thoughts on “संदीप देशपांडेंची “इंदुरी चाट”..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *