
file photo
प्रतिनिधी :मिलन शहा
युनायटेड नेशन्स: आता 21 डिसेंबर रोजी जगभरात जागतिक ध्यान दिवस साजरा केला जाणार आहे. संयुक्त राष्ट्र महासभेने यासंदर्भात एकमताने ठराव मंजूर केला. भारतासह इतर देशांच्या प्रयत्नांमुळे हे यश मिळाले आहे.भारतासह लिकटेंस्टीन, श्रीलंका, नेपाळ, मेक्सिको आणि अंडोरा हे देशांच्या मुख्य गटाचा भाग होते ज्यांनी शुक्रवारी 193 सदस्यीय संयुक्त राष्ट्र महासभेत ‘जागतिक ध्यान दिन’ नावाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.