
प्रतिनिधी : वैशाली महाडिक
इचलकरंजी : इचलकरंजी महानगरपालिका संचलित शाळा क्र 34 या ठिकाणी आज वाचन प्रेरणा दिन अत्यंत उत्साहात संपन्न झाला. यावेळी रोहित वनिता गजानन दळवी आणि अमित कोवे यांनी मुलांना फटाके नको पुस्तक हवे अशा पद्धतीचे मार्गदर्शन केले.
यावेळी केंद्रप्रमुख अदिप पाटील, पर्यवेक्षक संतोष गुरव, मारुती पाटील आदिंसह शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांना साधारण 50 जणांना सृजन प्रकाशनवतीने साने गुरुजी लिखित माझ्या स्वप्नातील आदर्श शाळा हे पुस्तक भेट देण्यात आले.
खुप सुन्दर विचार माण्डले आहेत
स्तुत्य कार्य
Nice
पुस्तकं वाचनाने विद्यार्थ्यांना एक चांगली प्रेरणा मिळेल व येणाऱ्या पुढील विद्यार्थी घडतील…