प्रतिनिधी : सुरेश बोर्ले
मुंबई : सध्या मराठा आरक्षण आंदोलन ही मुंबईच्या आझाद मैदानात सुरू असताना,पावसात भिजत मैदानाचा चिखल तुडवत,मराठा आंदोलक आंदोलनात भिडून
टक्कर आहेत.आता आरक्षण घेतल्याशिवाय परतायचे नाही. हा निर्धारच सकल समाजाने केला आहे.पण सरकारने हा सगळ्यांची केलेली सर्वबाजूने कोंडी ही एक अवहेलना आहे. अन्न,निवारा,पाणी ह्याची वानवा झाली.आंदोलक उपाशी राहिला पण मैदान सोडले नाही.फक्त एकाच जाती धर्माच्या बंधूंनी
आंदोलकांची पहिल्यांदा दखल घेतली,तो समाज म्हणजे,सकल मुस्लिम बांधव समाज.ह्या समाजाच्या नेत्यांनी जरांगेंची भेट देऊन, पाठिंबाही जाहीर केला.तर अनेक ठिकाणाहून मुंबईतही आंदोलकांची खाण्यापिण्याची सोय झोपायची सोयही केली. ह्याचा अर्थ असा होतो की,आम्ही भारतीय म्हणून एक आहोत! ही भावनाआज प्रत्येक जाती धर्मात रुजते आहे,ही एक चांगली गोष्ट घडत आहे.ही राजकीय मंडळींच नको तो खेळ खेळून,जातीय दंगली घडतील अशी कृती करतात. असा संशय जनतेत आहे.असाच सलोखा हा संपूर्ण हिंदुस्थानात रहावो!हीच जन भावना आज मराठा आंदोलनात दिसली.
सर्वधर्म संभाव ,एकोपयाचे दर्शन! हे खरे भारत!
Humanity first
मुस्लिम समाज पहिला माणूसकी बघतो बाकी गोष्टी नंतर.