सरकार,मराठा बळीराजाचा बळी देण्याचा प्रयत्न करीत आहे का?

Share


प्रतिनिधी : सुरेश बोर्ले

मुंबई: बळीराजा आहे म्हणूनच आम्हाला,आमच्या ताटात अन्न दिसत आहे व आपण मानवीजीवन जगत आहोत.ह्याच शेतीने ह्या मराठा समाजाला!सुखी समृद्ध बनवल होत.पण आता ह्या शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे.आडत्यांच्यामुळे व इतर गोष्टींमुळे बाजारभाव मिळत नाही.कर्जाच्या बोज्यामुळे हे शेतकरी आत्महत्या करीत आहेत.तर त्यांची लेकरं आज शिक्षणाच्या आरक्षणामुळे व आर्थिक कोंडीमुळे तेही आत्महत्या करीत आहेत.ही अतिशय गंभीर व लाजिरवाणी गोष्ट आहे.जर मराठा सदन शेतकरी आहेत,त्याचे ठीक आहे.पण जे मराठा असूनही, दरिद्री रेषेखाली आहेत! त्यांच्यासाठी हा आरक्षणाचा खटाटोप आहे.त्या मराठा समाजाला वर आणण्यासाठी हा पुढारी व मराठा बांधवांचा प्रयत्न आहे.आज तीन दिवस होत आले आहेत.अटी आणि शर्ती पाळून हे समाज बांधव हे सगळे लोकशाही तथा गांधीवादी पद्धतीने,आंदोलन आझाद मैदानात करत आहेत.तर महाराष्ट्रात मराठा समाजाची ही चळवळ सुरू असताना आणि सरकार त्यांना झुलवत असताना,परप्रांतीय मात्र ह्या गोष्टींची मजा पाहत आहेत. कबुतरानसाठी लोढा येतो. असे येथे अनेक लोढे लोंड्यासह उपस्थित आहेत.मग सरकार अजूनही नेत्यांची भेट घेण्यास शिष्ठमंडळ पाठवत नाही! हितर मोठी कमालच झालेली आहे. आंदोलकांची खाण्यापिण्याची राहण्याची सोय ही झालेली नाही.फलाटावर, बसथांब्यावर, टपऱ्यानमध्ये.गाड्यांमध्ये, मंदिरात,समुद्रकिनारी,नातेवाईक जिथे सोय होईल तेथे ही मोर्चेकरी आश्रय घेत आहेत.तर वर्तमान राजवटीने, सगळी उपहारगृहे,खानपान सेवा, टपऱ्या,पाणीसोय,लघुशंका व प्रतिर्विधीचीही बंद ठेवलेली आहे.
जेवणाचे कच्चे पदार्थ त्यांनी स्वतः आणलेले आहेत.भोजनही रस्त्याच्या आडोशाला शिजवून ग्रहण करीत आहेत.अशा सरकारी कृतीने हे आंदोलक आनकीनच आक्रमक झालेले आहेत.ज्याप्रमाणे दिल्ली सरकारने!शेतकऱ्याने आंदोलंन दडपले तीच क्रिया महाराष्ट्र सरकार करताना दिसत आहे,हयात शंका नाही.या आंदोलनात मुंबईकर भरडला जातोय,त्याला इलाज नाही. कारण आंदोलना शिवाय पर्याय नाही त्या शिवाय!सरकारचे लक्ष्य त्यांच्याकडे जाणार नाही.भिती फक्त हीच आहे की,सरकारच्या अश्या असहकार वृत्तीने हे आंदोलन आणखी चिघळू नये आणि त्याचे रूपांतर आक्रमक होऊ नये.ही विद्यमान सरकारनेच काळजी घ्यावी.ह्या मराठा समाजाचा आक्रोशी अंत पाहू नये.कारण ह्या आंदोलकांचा उत्पन्न होणारा दाह तुम्हाला परवडणारा नाही.केंद्रात काय महाराष्ट्रात काय हे वाघच कातडं अंगावर घेऊन बसलेल सरकार आहे. अगदी तकलादू हिंदुत्व दाखवून,जनतेची फसवणूक करणे हाच ह्यांचा उद्देश आहे. जेवढा तुम्ही ह्या समाजावर अत्याचार कराल,तेवढा हा समाज क्रांतीसाठी!उफाळून उठेल व यादवी माजेल?त्याची सर्वस्वी जबाबदारी ही वर्तमान राजवटीची असेल!हा मराठा समाजाची ही भावना सरकार पर्यंत पोचेल का?


Share

One thought on “सरकार,मराठा बळीराजाचा बळी देण्याचा प्रयत्न करीत आहे का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *