प्रतिनिधी : वैशाली महाडिक.
मुंबई : जैवविविधता संवर्धन संशोधन केंद्रातर्फे दिनांक २७-२८ सप्टेंबर २०२५ रोजी निसर्गानुभव कार्यशाळा साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक, वडघर, तालुका माणगाव, जिल्हा रायगड येथे आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेचा उद्देश निसर्ग सहवासातून आनंद मिळविणे, कोकणच्या निसर्गाकडे शास्त्रीय दृष्टीकोनातून पहायला शिकणे, जैवविविधता या संकल्पनेची ओळख करुन घेणे, पर्यावरण जतन व संवर्धन ह्याबद्दल विचार करणे हा आहे असे या कार्यशाळेच्या संयोजकांनी कळवले आहे. प्रसिध्द जैवविविधता तज्ञ पार्थ बापट हे या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक आहेत.
साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकात, स्मारकाचे जैवविविधता संवर्धन संशोधन केंद्र कार्यरत आहे. या केंद्रा अंतर्गत साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकात विविध कार्यक्रम, उपक्रम, कार्यशाळा व संशोधन प्रकल्प राबविण्यात येत आहेत. विविध वयोगटातील शालेय, महाविद्यालयीन पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी, जैवविविधता संशोधक, पर्यावरण कार्यकर्ते व अभ्यासक यांच्यासाठी या केंद्रातर्फे विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे.
निसर्गानुभव कार्यशाळेचा कालावधी शनिवार दिनांक २७ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजल्यापासून रविवार दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी २ पर्यंत असणार आहे. या कार्यशाळेत परिसर भ्रमंती (वृक्ष वेली, प्राणी पक्षी यांची ओळख), निसर्ग खेळ/ उपक्रम (जैवविविधता व माणूस यातील संबंध), पर्यावरण – संगीत (पर्यावरणाचे जतन संवर्धन), माहितीपट प्रदर्शन, चर्चा व गप्पांचा समावेश आहे. १२ ते ५५ वयोगटासाठी खुल्या असलेल्या या कार्यशाळेचे प्रवेश शुल्क नाममात्र ३०० रुपये इतके आहे. मर्यादित जागा असलेल्या या निसर्गानुभव कार्यशाळेची नोंदणी सुरू झाली असून नोंदणीसाठी स्मारक कार्यालय – 7776937844
चिंतामणी – 9657651035
राहुल – 9860619031 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जैवविविधता संवर्धन व संशोधन केंद्रातर्फे करण्यात आले आहे.
सामाजिक कार्यक्रतयां साठी महत्वाचे
Most needed