
प्रतिनिधी:सुरेश बोरले
मुंबई,विले पार्ले म्हटले की, मुबईच्या उपनगरातील,शैक्षणिक,
सांस्कृतिक सामाजिक कार्याचे माहेर घर आहे.येथे नेहमीच काहींना काही,समाजोपयोगी उपक्रम चालूच असतात. विशेष महत्वाचे म्हणजे,लहान मुलांच्या बुद्धी मत्तेला व अंगच्या कला गुणांना वाव आणि चालना मिळावी आणि एक नवी सक्षम पिढी तयार व्हावी!ह्या प्रेरित हेतूने विले पार्ले पूर्व येथील, “,साबरी प्रतिष्ठान” ही एक चांगली संस्था !बाल गोपालांसाठी, झटत असते.साधारणपणे 2008 साली ह्या संस्थेची स्थापना झाली.त्या कालावधी पासून,ही संस्था बाल गोपालानच्या,पाल्यान कडून एकही पैसा न घेता!कोणतेही, कुणाचेही आर्थिक सहाय्य न घेता किंवा पैसा कमावणे हा हेतू न ठेवता, गेली 15 वर्षे सतत अविरतपणे हा कार्यक्रम,ही संस्था करीत आहे.ह्या साबरी प्रतिष्ठान तर्फे लहांनांसाठी व किशोर वयीन मुलांनसाठी,खालील प्रमाणे कार्यशाळा आयोजन असते.त्यामध्ये बाल जल्लोष कार्यक्रम,शैक्षनिक सहली,१०वी नंतर काय करायचे मार्ग दर्शन?,फिरते वाचनालय,बाल स्ववसकार वरग्,बाल नाट्य शिबिर,खेळ व शारीरिक तंदरुस्ती मार्ग दर्शन शिबिर,पथ नाट्य प्रशिक्षण,रक्त दान शिबिर, अंधश्रध्दा निर्मूलन,विविध स्पर्धा,स्पर्धेच्या युगात कसा टिकाव धरावा,चित्रकला स्पर्धा,फान्सी ड्रेस स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम,बाल प्रबोधिनी वगेरे!लहान मुले व शालेय विद्यार्थी ह्या सगळ्यांचा सहभाग या कार्यक्रमात असावा! हा मनसुबा समोर ठवूनच बाल जल्लोष!या कार्यक्रमाची, मांदियाळी तयार असते. ह्यावरशी बालदिना निमित्ताने,”बाल जल्लोष 2023″ ह्या भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी,विले पार्ले व आसपास परिसरासाठी एकही छदाम माता पित्या कडून न घेता विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे,हे विशेष! साधारणपणे 4 ते 14 वर्षे पर्यंतच्या मुलांना या जल्लोष्यात सामील होता येईल.ह्या कार्यक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद मिळावा ह्या हेतूने लोकांना माहिती व्हावे, त्यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे.ह्या प्रतिष्ठानचे सरर्व सर्वा मा.विनायक सुर्वे ह्यांच्याशी संपर्क केला असता,त्यांनी आपला हा मनोदय कळवला.पारल्या सहित मुंबईतील माता पित्यंना “आवाहन” आहे की,आम्ही दिलेल्या माहितीची नोंद घेऊन,आपल्या मुंलानच्या उज्वल भविष्य साठी,आपण त्यांना ह्या जल्लोषात सामील करावे. त्यासाठी सोबत एक फॉर्म ही पाठवत आहे.याची आपण अवश्य नोंद घ्यावी.कार्यक्रमाची तारीख लवकरच सांगण्यात येईल,साधारणपणे नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हा कार्यक्रम होईल.असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.विनायक सुर्वे यांनी स्पष्ट केले.
बाल जल्लोष कार्यक्रम स्व.सतीश दुभाषी
मैदान,नेहरू रस्ता, विले पार्ले (पू)मुंबई -400057.या ठिकाणी होणार आहे.