
प्रतिनिधी : उत्कर्ष बोर्ले
मुंबई : सह्याद्री नवतरुण मित्र मंडळ सह्याद्री नगर चारकोप कांदिवली पश्चिम या नवरात्री मंडळाचे हे २७ व्या वर्षात पदार्पण.सामाजिक बांधिलकी जोपासताना हनुमान जन्मोत्सव व भंडारा ,मोफत नेत्र चिकित्सा शिबीर ,रक्तदान शिबीर ,आधार कार्ड शिबीर ,गुणवंत विद्यार्थी गुण गौरव,कोरोना योद्या यांचा सन्मान ,अनाथ आश्रमातील मुलासाठी अन्न छत्र ,महिला सफाई कामगारांना मोफत साडी वाटप ,वेशभूषा स्पर्धा ,महिलांसाठी हळदीकुंकू ,भव्य किल्ले प्रदर्शन ,रांगोळी स्पर्धा ,असे एक ना अनेक उपक्रम मंडळांच्या माध्यमातून आम्ही गेल्या २७ वर्षात राबविले आहेत या बद्दल चारकोप पोलीस स्टेशन ,विविध संस्थांनी देखील मंडळास सन्मानित केले आहे ,
डिजिटलायजेंशनच्या आधुनिक युगात वारकरी संत परंपरा आणि पवित्र दिंडी सोहळयात दरवर्षी व चुकता सहभागी होते आणि एक दिवस वैष्णवांच्या मेळाव्याची पंगत रुपी सेवा बजावून महाराष्ट्राची महान संस्कृती आणि थोर परंपरा जपण्याचा पुरेपूर प्रयत्न मंडळ करीत आहे
खुप छान
Good