सुरेशचंद्र राजहंस यांची मुंबई काँग्रेसच्या मुख्य प्रवक्ते पदी नियुक्ती.

Share

प्रतिनिधी :मिलन शहा

मुंबई :मुंबई विभागीय काँग्रेसच्या मुख्य प्रवक्तेपदी सुरेशचंद्र राजहंस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षाताई गायकवाड यांनी त्यांच्या नियुक्तीचे पत्र दिले देऊन नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या.

सुरेशचंद्र राजहंस यांनी यापूर्वी काँग्रेस पक्षात प्रवक्ते, मुंबई काँग्रेसच्या स्लम सेल विभागाचे अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते यासारख्या महत्वाच्या पदावर काम केले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्रवक्ते आणि माध्यम समन्वयक अशी दुहेरी भूमिका बजावली. 2022 साली सकाळ समूहाच्या वतीने सकाळ आयडॉल ऑफ महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे तर 2023 रोजी प्रेस, पत्रकार संघाच्या वतीने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. लोकनेते एकनाथराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले राजहंस हे मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड यांचे कट्टर समर्थक मानले जातात.

“मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला मुंबई काँग्रेसच्या मुख्य प्रवक्ते पदाची जबाबदारी देवून माझ्यावर जो विश्वास टाकला आहे त्याबद्दल मी सर्व मान्यवर नेत्यांचे आभार मानतो. पक्षाची बाजू अधिक ताकतीने मांडण्याचा प्रयत्न करेल आणि माझ्यावर टाकलेल्या विश्वास सार्थ करण्याचा कसोशीने प्रयत्न करेन”, असे राजहंस म्हणाले.


Share

One thought on “सुरेशचंद्र राजहंस यांची मुंबई काँग्रेसच्या मुख्य प्रवक्ते पदी नियुक्ती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *