
एसएमएस -प्रतिनिधी -मिलन शहा
मुंबई : आज दादर येथील शिवसेनाभवनात मुंबईतील शाखाप्रमुखांची बैठक संपन्न झाली. पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांनी बैठकीला उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी उद्धवसाहेबांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात राबविण्यात आलेल्या विविध विकासात्मक व लोकाभिमुख कार्यक्रमांवर आधारित ‘मुंबई मॉडेल’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
या बैठकीस शिवसेनेचे नेते, उपनेते, सचिव, खासदार, आमदार तसेच विभागप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत संघटनात्मक मजबुती, मुंबईतील प्रश्न आणि आगामी काळातील पक्षाची भूमिका यावर चर्चा करण्यात आली.
Good
Ohhh