
प्रतिनिधी :वैशाली महाडिक
मुंबई : घाटकोपर मधील चिराग नगर येथील दाट वस्तीतील मशिदीतून ईदची नमाज अदा केल्यानंतर नमाजी बाहेर पडताना, गांधी टोप्या घातलेल्या काही हिंदू नागरिकांनी मुस्लिम बांधवांना गुलाब देऊन त्यांचे स्वागत करत ईद च्या शुभेच्छा दिल्या. हे पाहून आनंदाने आश्चर्यचकित होऊन, मुस्लिम नागरिकांनी हिंदूंना मशिदीत आमंत्रित केले.
जातीय सलोखा नांदावा आणि हिंदू मुस्लिम प्रेम वाढवत एक दुसऱ्या प्रति विश्वास अधिक घट्ट करण्याच्या उद्देशाने हम भारत के लोग या चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शरद कदम, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शहाजी पाटोदेकर,स्थानिक कार्यकर्ता कालू भाई यांनी पुढाकार घेत सर्वधर्म समभाव आणि जातीय सलोख्यासाठी सर्व धर्मीय, जातीय नागरिकांनी भयमुक्त जीवन आनंदाने जगावे तसेच एक दुसऱ्याच्या प्रति आदर आणि विश्वासघट्ट व्हावे या उद्देशाने हिंदू बांधवांनी ईद च्या निमित्ताने मुस्लिम बांधवांना गुलाबाचे फुल देत त्यांना ईद च्या शुभेच्छा दिल्या.वर्धा येथील गांधीवादी विजय तांबे यांनी कदम यांना ही कल्पना सुचवली होती.
“वेगवेगळ्या संघटनांशी संबंधित आपण सर्वजण एकत्र काम करतो,” कदम म्हणाले. “आजचे वातावरण असे असू शकत नाही.आपल्याला एकमेकांशी विश्वास आणि मैत्री निर्माण करण्याची गरज आहे.-शरद कदम, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते
मशिदीच्या आसपासच्या परिसरांशी: पारशीवाडी आणि यासीन मिस्त्री चाल येथे पाटोदेकर,
कदम आणि त्यांच्या साथीदारांच्या प्रेमाने प्रभावित होऊन, मुस्लिमांसाठी नव्याने तयार झालेल्या नात्यामुळे त्यांनी हा वारसा पुढे नेण्याची शपथ घेतली.
“आम्ही हा सलोखा ईदपुरता मर्यादित ठेवणार नाही, आम्ही तो कायमचे चांगले संबंध बनवू अशी प्रतिक्रिया मुस्लिम बांधवांनी दिली.
नफरतों के बाज़ारमें मोहब्बतों की दुकान लावण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे… शहाजी पाटोदेकर
