‘हेवी डिपॉझिट’च्या आमिषाने 8.5 लाखांची फसवणूक.

Share

एसएमएस -प्रतिनिधी – कृष्णा वाघमारे

मुंबई :घर खरेदीच्या प्रयत्नात असलेल्या एका तरुणाला व त्याच्या वडिलांना ‘हेवी डिपॉझिट’च्या आमिषाने सुमारे ८ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार गोरेगाव परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी बांगुरनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधितांवर गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे.

एजंटमार्फत ओळख, व्यवहाराची सुरुवात

मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगावमध्ये घर खरेदीच्या शोधात असलेल्या तरुणाची एका एजंटमार्फत भिसे कुटुंबाशी ओळख झाली. सुरुवातीला ओशिवरा बस डेपो समोरील कृष्णा बिल्डिंगमधील सदनिकेचा प्रस्ताव देण्यात आला. मात्र, ती इमारत एसआरए अंतर्गत असल्याने बँक कर्ज मिळण्यास अडचणी येत असल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधितांनी हा व्यवहार नाकारला.

हेवी डिपॉझिट’चे आमिष

यानंतर भिसे कुटुंबीयांनी ‘हेवी डिपॉझिट’ योजनेचा प्रस्ताव मांडत ८.५० लाख रुपये भरल्यास सदनिकेचा ताबा मिळेल व दरमहा १५ हजार रुपये भाडे मिळेल, असे आश्वासन दिले. या आश्वासनावर विश्वास ठेवून तरुणाने जून २०२३ मध्ये करार करून संपूर्ण रक्कम बँक व्यवहार व धनादेशाद्वारे अदा केली.

मालकीच नसताना करार

काही महिन्यांनंतर भाडे मिळणे बंद झाल्याने चौकशी केली असता धक्कादायक बाब समोर आली. शिवाजी माधवराव भिसे यांनी स्वतःला मालक म्हणून सादर केले असले तरी ते प्रत्यक्षात त्या सदनिकेचे मालक नसल्याचे निष्पन्न झाले. तसेच, संबंधित सदनिका तिसऱ्याच व्यक्तीला भाड्याने देण्यात आल्याचेही उघड झाले.

या प्रकरणात दखल पात्र गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.


Share

One thought on “‘हेवी डिपॉझिट’च्या आमिषाने 8.5 लाखांची फसवणूक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *