
प्रतिनिधी:वैशाली महाडिक
मुंबई,अंधेरी पश्चिमेतील डी. एन.नगर येथील समुद्र दर्शन मिडल कॉलॉनीत न्यू युथ क्लब सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बाप्पा म्हणजेच अंधेरीचा विघनहर्ता मागील 56 वर्षा पासून पर्यावरण वाचवण्याचा संदेश देत आहे.आपल्या कडे अनेक उदाहरण आहेत तसेच बाप्पाच्या मूर्ती ची उंची वाढविण्यासाठी अधिकतर मंडळ प्रयत्नशील असतात तर काहींच्या मध्ये उंची वाढवण्यावरून स्पर्धा ही अनौपचारिक पद्धतीने होताना जाणवते .मात्र मागील 56 वर्षांपासून एक इंच ही उंची न वाढवता साडेपाच फूट बाप्पाच्या मूर्तीची उंची मर्यादित ठेवून न्यू युथ क्लब गणेशोत्सव मंडळाने पर्यावरणा चा ह्रास होऊ नये या साठी समाजात अनोखा अस उदाहरण पुढे ठेवत समाजभान जपून सण साजरा करताना पर्यावरणाचा ह्रास टाळण्याचा भरपूर प्रयत्न करत आहे.या उत्कृष्ट कामासाठी मंडळाची कार्यकारिणी तसेच सर्व सभासदांचं कौतुक केलंच पाहिजे.तसेच सर्वधर्मसमभाव चा अनोखा उदाहरण या मंडळाने जपले असून सामाजिक एकोप्याचा संदेश देत विघनहर्ता ला नैवेद्य सर्व मिळून आळीपाळीने आप आपल्या घरात बनवून आणतात त्यात ही समाज एक धाग्याने बांधले जाते.मंडळाचे अध्यक्ष हर्षित परमार ,सचिव सागरमुळे, खजिनदार अरविंद नाडार,उप खजिनदार राहुल वैसाने तसेच कार्यकारिणी सदस्य जय कुट्टी व इतर सभासद मिळून अंधेरीचा विघनहर्ता चा आयोजन यशस्वीपणे करत नुसतं उत्सव साजरा न करता समाजात एकोपा निर्माण करत समाज एकसंघ करण्याच्या दृष्टिकोनातून तसेच पर्यावरणाचा ह्रास थांबवण्यासाठी नुसतं देखावा करत नाही तर प्रत्यक्षात अंमलात आणून पर्यावरण आणि उत्सव यात समतोल साधत आहेत.त्यामुळे न्यू युथ क्लब सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बाप्पा म्हणजेच अंधेरीचा विघनहर्ताची ख्याती मुंबई सह देश आणि जगात पोहचली आहे.

महिलांनासर्व गोष्टीं साठी प्राधान्य दिले जाते तसेच दहा दिवस वेग वेगळे खेळ खेळले जातात यात मैदानी खेळांचा ही समावेश असतं तसेच पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चना करत गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो.
Very good initiative keep this up