
प्रतिनिधी :सुरेश बोरले
मुंबई,साधारणपणे, सन 1967/68 मध्ये हा पूल बांधला गेलेला आहे.परंतु दुर्दैवाने,ह्या पूलाचा कांहीं भाग हा कांहीं वर्षांपूर्वी कोसळला.त्यामधे जीवित हनिही झाली.पण त्यानंतर मात्र,ह्या पूलाचे काम अगदी संत गतीने होताना दिसते.त्यामुळे वाहने चालवणाऱ्या किंवा पादचारी म्हणून,लोकांना ये जा करण्यास त्रास होत आहे.कारण हाच एकच पूल,फक्त पूर्व पश्चिमेला जायला आहे.आता जर आपल्याला पूर्व पश्चिम जायचे जाल्यास,एक तर तुम्हाला,विले पार्ले बिस्कीट कंपनीचा रस्ता पकडावा लागतो.कारण हा रस्ता आखूड व जुना आहे,वाहनांना यायला जायला कमी पडतो आहे.त्यामुळे येथे नेहमी, पादचाऱ्यांची,दुचाकी वाहने,तीन चाकी,चारचाकी वाहांनाची गर्दी असते.कारण मुळात पार्ल्याला जाणारे प्रवासी आहेतच.पण त्या जोडीला,आता अंधेरी जोगेशेवरीची,कुर्ला ची भर पडली.त्यामुळे हे घडत आहे.नाहीतर मग तुम्हाला,अंधेरी मोग्रा रेल्वे पूलाचा आधार घ्यावा लागतो.तो तर ह्या पेक्ष्याही खतरनाक आहे.कारण हा रस्ता सरळ एस.वी.रस्त्याला जोडतो. त्यामुळे,जोगेश्वरी,वर्सोवा,विलेपार्ले कडे जाणाऱ्यांची गर्दी होते. आतातर,पावसात पाहायलाच नको.वीचारून सोय नाही!पाऊस असे पर्यंत,ह्या पुलाखाली पाणी असते.म्हणजे हा मार्ग जामच रहिला,मग तो उरला आता फक्त,पारल्याचाच मार्ग!नाही तर मग मिलन सबवे?आत्ता तर पावसाळा सुरू झालेला आहे.मग वाहनांची गर्दी,ही तिन्ही मार्गावर होणार.एकंदरीत तारांबळ उडणार आहे.त्यापेक्षा,ज्यांच्या अधिपत्याखाली,हा पूल बनविण्याचा,अधिकार आहे,त्यांनीच आत्ता हे मनावर घ्यावं व ह्या अनेक मार्ग जोण्याऱ्या,ह्या पुलाचे काम लवकरात लवकर,पूर्ण करावे व जनतेची, होणारी गैरसोय दूर करावी.कारण पुलाच्या कामासाठी खोदलेले मोठे मोठे खड्डे हे पावसासाठी कामगारांना व ये जा करणाऱ्या लोकांनाही धोकादायक आहेत.हे समंधित खात्याने जाणून घ्यावे व पुलाचे काम जास्तीत जास्त लवकर करता येईल तेवढे करावे,ही जनतेची मागणी आहे.