एसएमएस -प्रतिनिधी-सुरेश बोर्ले
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार सध्या मोठ्या अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. कोरेगाव (पुणे) परिसरातील सुमारे ४० एकर महार वतनदारीची जमीन केवळ ३०० कोटींना विकत घेतली, अशी गंभीर आरोपाची तोफ उभाटचे नेते अंबादास दानवे यांनी डागली आहे. या जमिनीची खरी किंमत सुमारे १८०० कोटी रुपयांहून अधिक असल्याचे सांगितले जात आहे.
दानवे यांनी या व्यवहाराचे काही पुरावे सादर केले असून, त्यांनी हा प्रकार “संगनमताने झालेला” असल्याचा आरोप केला आहे. नियमानुसार वतनदारीची जमीन सरकारी परवानगीशिवाय विकता येत नाही, मात्र या प्रकरणात स्थानिक कलेक्टरलाही माहिती नसल्याचे समोर आले आहे, ही गंभीर बाब मानली जात आहे.
सदर व्यवहारात केवळ ₹५०० स्टॅम्प ड्युटी भरल्याचे उघड झाले असून, त्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांचेही संगनमत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच पार्थ पवार यांच्या कंपनीचा पत्ता हा अजित पवार यांच्या अधिकृत निवासस्थानाचा असल्याचे दस्तऐवजांतून स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली असून, त्यांनी अजित पवार यांनी राजीनामा द्यावा, अशी थेट मागणी केली आहे.
जनतेमध्ये या प्रकरणावरून मोठी खळबळ उडाली असून, “कोणी कुणाला फसवले आणि कोणी फसवले गेले?” हा प्रश्न सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे.
अब बब ब..
चार दिवस बोमाबोम नंतर सर्व शांत काहि हि होणार नाही हे खर
चार दिवस बोमाबोम नंतर सर्व शांत काहि हि होणार नाही हे नक्की
Such a big scam
निवडणुका आल्या की सर्वच भ्रष्टाचाराचे बिगुल वाजतात.मात्र,आज पर्यंत चौकशी होऊन अद्याप कुणालाच योग्य ती शिक्षा झालेली नाही.