
छाया चित्र :संपत जाधव मान्यवारांच्या हस्ते नियुक्ती पत्र स्वीकारताना
प्रतिनिधी :सुरेश बोर्ले
सातारा : ९९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागत समिती सदस्यपदी संपत जाधव यांची निवड. यंदाचे हे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे. आणि याचे आयोजन साताऱ्यामध्ये होत आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, शाखा शाहूपुरी आणि मावळा फौंडेशन या संमेलनाचे संयुक्तपणे आयोजन करते आहेत. या संमेलनासाठी संपत जाधव यांनी केलेल्या योगदानाची दखल घेत. संमेलनाचे स्वागताध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, मा.ना.श्री.छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखालील ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागत समितीच्या सदस्यपदी जाधव यांची सन्मानपूर्वक म.सा.प. शाहुपुरी शाखा व मावळा फौंडेशनच्या वतीने निवड करण्यात आली आहे.अशी माहिती श्री.विनोद कुलकर्णी -कार्याध्यक्ष श्री. नंदकुमार सावंत -कोषाध्यक्ष यांनी संपत जाधव यांची नियुक्तीची माहिती दिली. संपत जाधव यांचे समाजातील सर्वच थरातून कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Congrats Shri Sampat Jadhav ji