अदाणी इलेक्ट्रिसिटी विद्युत कामगार सेनेच्या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

Share

प्रतिनिधी :वैशाली महाडिक

मालाड, ता.17(वार्ताहर ) गोरेगाव पूर्वेतील आरे येथे अदाणी इलेक्ट्रिसिटी विद्युत कामगार सेनेच्या शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला . अदाणी इलेक्ट्रिसिटी विद्युत सेनेच्या  वार्षिक शिबिराचे उदघाटन स्थानिक लोकाधिकार समिती अध्यक्ष आणि विधान परिषदेचे  आमदार विलास पोतनीस आणि कंपनी चे एच आर अनिरुद्ध केकाळे तसेच अध्यक्ष वामन कदम, कार्याध्यक्ष भारत दळवी सरचिटणीस मंगेश दळवी अतिरिक्त सरचिटणीस कैलास चव्हाण व इतर मान्यवर आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित शिबिराचे उदघाटन पार पडले.प्रसंगी मान्यवरांनी उपस्थित शिबिरार्थिंना मोलाचे मार्गदर्शन केले.सदर शिबिर यशस्वी करण्यास,शिबिर प्रमुख,नितीन पवार व कार्यकत्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. शिबिरात मोठ्या संख्येने विद्युत कामगार उपस्थित होते. येणाऱ्या  2026 चे  मागणी पत्र आणि संघटनामक बांधणी व येणाऱ्या नवीन कायद्यांची आवाहने,यावर मान्यवरांनी उत्तम प्रकारे  मार्गदर्शन केले.


Share

One thought on “अदाणी इलेक्ट्रिसिटी विद्युत कामगार सेनेच्या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *