
मुंबई, मालाड पश्चिमेतील मालवणीत राष्ट्र सेवा दल, मालवणी च्या कार्यालय येथे ज्येष्ठ सफाई कर्मचारी महिला अदिकांना काउंडर यांच्या हस्ते तर काचपाडा शाखेत पुरुष सफाई कर्मचारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.आपल्या समाजात आर्थिक आणि सामाजिक रित्या मागासलेले पण समाजात महत्वाचा योगदान देणारे सफाई कर्मचारी महिला आणि पुरुषांना सेवा दलाच्या वतीने झेंडावंदनाचा मान देत त्यांचा सन्मान केला गेला.या प्रकारे सेवा दलाने खऱ्या अर्थाने आर्थिक व सामाजिक मागासलेले आणि समाजात आर्थिक रितीया पुढारलेल्यांना स्वातंत्र्या च्या 75व्या वर्षी एकत्र एकाच ठिकाणी एकत्र करत सामाजिक समतेचा आणि मानवतेचा संदेश दिला.प्रसंगी सफाई कर्मचारी रमेश परमार व पालिनीअम्मा संपत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले या वेळी राष्ट्र सेवा दल, मालवणी अध्यक्षा नमिता मिश्रा काचपाडा अध्यक्षा मेरी शेट्टी तसेच सफाई कर्मचारी पुनीता काउंडर,सगाई सेलवी,पलिनीअम्मा स्वामि, अदिकांना काउंडर, सगाई सेलवी, परमार,लक्ष्मी काउंडर,पलिनीअम्माचिंनास्वामी, प्रकाश जैस्वार,सुजल मिश्रा,सोनू शेख,अनुप मिश्रा,,उज्वल मिश्रा,नीता पवार,विद्या चव्हाण,निर्मला जैस्वाल, करण कानोजिया,किरण मोरे,येशू कामात,येसूदस चेट्टीराजेश मकवाना,फिरोज अन्सारी,सुरेश शेलार,प्रकाश गुप्ता ,वैशाली महाडिक,सुरेश शेलार,निसार अली, उत्कर्ष बोरले,गोपाळ महापणकर, कृष्णा वाघमारे, शशी गुप्ता व इतर मान्यवर ,पदाधिकारी व कार्यक्रर्ते उपस्थित होते.