प्रतिनिधी:वैशाली महाडिक
मुंबई,अनाथ , वंचित आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा मुलांसाठी काम करणाऱ्या मराठवाड्यातील शांतिवन (बीड) संस्थेच्या अनाथ मुलींसाठी बांधण्यात येणाऱ्या मदतीसाठी मुंबईतील आनंदवन मित्र मंडळाने रविवार 29 मे रोजी बोरिवली येथे एका कार्यक्रमाचे आयोजन केले असून या उपक्रमासाठी योगदान देण्याचे आवाहन मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र मेस्त्री आणि आनंदवन मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
सकाळी साडे दहा वाजता बोरिवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिध्द नेत्ररोगतज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने ,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. गिरीश कुलकर्णी हे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाण्याचे मान्य केले आहे. यावेळी चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित आणि निर्मिती सावंत, वैभव मांगले यांची प्रमुख भूमिका असलेल्या “संज्या छाया” या नाट्य प्रयोगाचे आयोजन केले आहे. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शांतिवन संस्थेस निधी समर्पित करण्यात येणार आहे. तरी आपण सर्वांनी उपस्थित राहून उपकृत करावे असे आवाहन आनंदवन मित्र मंडळ,मुंबई तर्फे करण्यात आले आहे.
आपणास नम्र विनंती आहे. या नाटकाच्या देणगी प्रवेशिका घेऊन आपला खारीचा वाटा उचलावा. आयकर अधिनियम 80G अंतर्गत 50टक्के देणगी करमुक्त आहे.
कार्यक्रमात कै.कमलाकर ठाणेकर स्मृती पुरस्कार देऊन डॉ.बाबा आढाव यांच्या “ हमाल पंचायत पुणे” या संस्थेचा गौरव करण्यात येणार आहे.
याच कार्यक्रमात डॉ. बाबा आढाव यांच्या “ हमाल पंचायत पुणे” या संस्थेस कै. कमलाकर ठाणेकर स्मृती पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
देणगी प्रवेशिकेसाठी संपर्क :- श्री.नरेंद्र मेस्त्री — मोबाईल:9822502851श्री.सिद्राम बंडगर -9892881112