अन्नदान हेच महादान!

Share

एसएमएस- प्रतिनिधी -सिद्धेश्वरी शर्मा

श्री संत शिरोमणी नामदेव महाराज भक्ती मार्ग, पंढरपूर येथे नित्यनाम सेवा आणि नामा प्रसाद उपक्रम अंतर्गत अन्नदान संपन्न!

पंढरपूर :श्री दामाशेटी गोणाई मंदिर विस्थापित नगर, भक्ती मार्ग, पंढरपूर येथे दररोज सुरू असलेल्या नामा प्रसाद सेवा व नामा रोटी सेवा उपक्रमाअंतर्गत अन्नदान मुंबईतील मालाड मालवणी येथील ज्येष्ठ नागरिक सौ. रेखा सुरेश कोटक (वय ७२ वर्षे) यांनी केले.

हे अन्नदान त्यांनी आपल्या पती वैकुंठवासी सुरेश परागजी कोटक यांच्या प्रेमळ स्मरणार्थ अर्पण केले.

दान केलेले अन्न रेल्वे स्टेशन परिसर व बसस्टँड परिसरातील अंध, अपंग, निराधार, गरजू, मनोरुग्ण आणि वारकरी बांधवांना वाटण्यात आले.

या प्रसंगी सौ. सरिता दिनेश माने ताई आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.अन्नदान हे महादान मानले जाते. पंढरपूर वैकुंठ नगरीत संत नामदेवरायांनी सांगितल्याप्रमाणे —

“एक शीत दिधल्या अन्न, कोटी कुळांचे उद्धरण!”

अन्नदानाच्या या पुण्यकार्याने असंख्यांना समाधान आणि आशीर्वाद लाभला.
चला, आपण सर्वजण या पवित्र कार्यात सहभागी होऊया
राम कृष्ण हरी! जय हरी विठ्ठल! जय बाळूमामा! जय जनार्दन! जय नामदेव!


Share

4 thoughts on “अन्नदान हेच महादान!

  1. अन्न दान हेच श्रेष्ठदान आहे.म्हणूनच जमेल तितकं अन्नदान करायला हवं…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *