
मुंबई : चारकोप सह्याद्रीनगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन. डी. पाटील विद्यालयाच्या कर्मवीर इंटरऍक्ट क्लबने शुक्रवार, दिनांक ३ ऑक्टोबर रोजी सामाजिक बांधिलकी जपत अमली पदार्थ सेवन विरोधी जनजागृती मोहीम यशस्वीपणे राबवली. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित या उपक्रमात जनजागृती रॅली व विशेष सभेचा समावेश होता.
विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी परिसरामध्ये काढलेल्या जनजागृती रॅलीने उपस्थितांचे लक्ष वेधले. या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी मादक पदार्थांचे सेवन न करण्याचा संदेश देणाऱ्या घोषणा व पोस्टर्स झळकवून समाज प्रबोधन केले. या मोहिमेत नशा बंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, मुंबई उपनगर जिल्हा समन्वयक श्रीमती दिशा कळंबे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जरे एस. एम., रोटरी क्लबचे प्रतिनिधी रिमा वाही, सुनीता हिर्लेकर, विकास हिर्लेकर, फिरदोस अली, नंदिता सराफ, शिक्षक प्रबळकर एन. एस. आणि कर्मवीर इंटरऍक्ट क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उत्साहाने सहभागी झाले होते.
मार्गदर्शनपर विशेष सभा
रॅलीनंतर आयोजित सभेमध्ये महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. प्रबळकर एन. एस. यांनी प्रास्ताविक केले, तर कु. आरोही धुमाळ हिने प्रमुख अतिथी दिशा कळंबे यांचे परिचय व स्वागत केले. यावेळी दिशा कळंबे यांनी अमली पदार्थ सेवनाचे गंभीर दुष्परिणाम स्पष्ट करत, भावी पिढी म्हणून विद्यार्थ्यांची भूमिका किती महत्त्वाची आहे, यावर सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमार दक्ष दबडे याने केले आणि कु. समृद्धी भोसले हिने उपस्थितांचे आभार मानले. विद्यालयाच्या या उपक्रमाने तरुणांना व्यसनांपासून दूर राहण्याचा महत्त्वपूर्ण संदेश दिला.
Very good.
Yogesh sagar gopal Shetty charrcope senior officer ye sab ko strict action lena chahiye ye sirf ek din ke liye baner se kuch bhi awareness nai aayega
Veryverygood
Good