प्रतिनिधी :मिलन शहा.
अमित तिवारीने त्याची चुलत बहीण शिल्पाची हत्या केली त्यानंतर शव सुटकेसमध्ये ठेवून जाळण्याचा प्रयत्न केला!
दोघेही गाजीपूरमध्ये दोन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते
दिल्ली: गाझीपूरमध्ये एका तरुणाने आपल्या चुलत बहिणीची हत्या केली आणि नंतर तिचा मृतदेह सूटकेसमध्ये ठेवल्यानंतर जाळून टाकला. या हत्येप्रकरणी अमित तिवारी आणि त्याचा मित्र अनुज यांना अटक करण्यात आली आहे. डीसीपीने सांगितले की, मृत मुलगी, 22 वर्षीय शिल्पा पांडे, तिचा चुलत भाऊ अमित तिवारीसोबत वर्षा भरा पासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होती. शिल्पा अमितवर लग्नासाठी दबाव आणत होती. तर अमितला शिल्पापासून सुटका करून घ्यायची होती. 25जानेवारी रोजी अमितचे शिल्पासोबत भांडण झाले आणि त्याने तिचा गळा दाबून खून केला. यानंतर, त्याने त्याच्या मित्रासह मृतदेहाची विल्हेवाट लावली. 26 जानेवारी रोजी पहाटे1.45 वाजता गाजीपूरमधील एका निर्जन ठिकाणी मृतदेह एका सुटकेसमध्ये भरून आग लावण्यात आली होती.