एसएमएस – प्रतिनिधी-सुरेश बोर्ले
एकही कसोटी सामना न खेळलेला, पण रणजी क्रिकेटचा सुपरस्टार ठरलेला अमोल मुझुमदार — नुकत्याच झालेल्या महिलांच्या विश्वचषकात भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून झळकला आणि संघाला विजेतेपद मिळवून दिले. पण या विजयामागे एक वेगळीच गोष्ट दडलेली आहे — मुझुमदारसारख्या प्रतिभावान खेळाडूला कधीच कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही, हीच त्याच्या कारकिर्दीची मोठी शोकांतिका!
मुंबई रणजी संघाचा कणा असलेला मुझुमदार जवळपास ११,१६१ धावा, ३० शतके आणि ६० अर्धशतके अशा दमदार आकडेवारीसह भारतीय क्रिकेटच्या इतिहासात नाव नोंदवून गेला. ४८.१३ च्या सरासरीने १७१ सामने खेळलेल्या या फलंदाजाला तरीही भारताच्या कसोटी संघात स्थान मिळाले नाही. त्याच्या काळात संघात राहुल द्रविडसारखी ‘भिंत’ उभी असल्याने, मुझुमदारला संधीच मिळाली नाही.
हीच शोकांतिका स्व. पद्माकर शिवलकर यांच्या बाबतीतही घडली. मुंबई रणजी संघातील डावखुरे फिरकीपटू म्हणून ते प्रसिद्ध होते. पण भारतीय संघात त्या काळात बेदी, प्रसन्ना, चंद्रा आणि व्यंकट या चौकडीने आपले स्थान पक्के केले होते. परिणामी शिवलकर, तसेच राजस्थानचे राजेंद्र गोयल यांसारखे खेळाडूही कसोटी क्रिकेटपासून वंचित राहिले.
स्पर्धा, काळ आणि नशिब — यांच्यापुढे काही वेळा प्रतिभाही हतबल ठरते, याचं जिवंत उदाहरण म्हणजे अमोल मुझुमदार, पॅडी शिवलकर आणि राजेंद्र गोयल ही नावे!
Greatest
मोठ यश मिळवून देत इतिहासघडवले
प्रथम अमोलला अभिनंदन!…
भारतात असे अनेक खेळाडू आहेत.मात्र,सरकार खेळाडूंना योग्य पाठबळ देत नसल्याने अनेक खेळाडू फक्त नावापुरतेच उरले आहेत.
Great