फेब्रुवारी २०२५ ऐवजी नोव्हेंबर २०२४ मध्ये निवडणुका घ्या. अरविंद केजरीवाल…

file photo
प्रतिनिधी :मिलन शहा
दिल्ली :मिळालेल्या माहितीनुसार काही लोक म्हणतात की सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या निर्बंधांमुळे आम्ही काम करू शकणार नाही. सर्वोच्च न्यायलयाने बंधने घालण्यात कसर सोडली नाही… मी प्रामाणिक आहे असे तुम्हाला वाटत असेल तर मला मोठ्या संख्येने मतदान करा. निवडून आल्यानंतरच मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसेन. फेब्रुवारीमध्ये निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्राच्या निवडणुकां सोबत नोव्हेंबर महिन्यात निवडणुका घ्याव्यात अशी माझी मागणी आहे… जोपर्यंत निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत पक्षातील कोणीतरी मुख्यमंत्री असणार असं ते म्हणाले येणाऱ्या 2-3 दिवसांत आमदारांची बैठकित नवीन मुख्यमंत्री निवडला जाणार.