अरविंद केजरीवाल यांना ईडी कडून अटक!

Share

प्रतिनिधी :सुरेश बोरले


प्रतिनिधी… दिल्लीचे वर्तमान मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे सरवे सरवा आरविंद केजरीवाल ह्यांना नुकतीच अटक करण्यात आलेली आहे. तर त्यांच्या अनेक सहकार्याना सरकारने आधीच अटक केलेली आहे. मद्य घोट्याल्या बाबत त्यांना अनेक नोटिसेस ई डी.तर्फे पाठवण्यात आलेल्या होत्या!परंतु त्या नोटिसिंना त्यांनी स्वीकार नव्हता केला.त्यांचं म्हणं होत की!पाठवलेल्या सर्व नोटिसा ह्या बेकायदेशीर आहेत.त्याविरुध्द त्यांनी दिल्ली हाई कोर्टात याचिकाही दाखल केलेली आहे.त्यांना अटक केल्याने, दिल्ली आम आदमी पार्टीच्या लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले.कारण त्यांना अटक केल्यावर,थोड्याच वेळात ईडी समोर पेश करण्यात येईल.तसेच केजरीवाल ह्यांच्या घरावरही मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता .अरविंद केजरीवाल हे आय एस.अधिकारी व ह्या आम आदमी पार्टी चे संस्थापक अण्णा हजारे ह्यांचे खास दुसऱ्या फळीचे नेते होते.परंतु केंद्रात भाजपा असताना, दिल्लीत आम आदमी सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आले हे विशेष व दुसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत.पुढे काय होणार?ह्याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.दरम्यान आम आदमी पक्षाच्या वतीने देशात अनेक ठिकाणी केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध करण्यात येत आहे.


Share

One thought on “अरविंद केजरीवाल यांना ईडी कडून अटक!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *