
file photo
प्रतिनिधी : मिलन शहा
दिल्ली : आम आदमी पार्टी चे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाआज दि. 13 सप्टेंबर 2024सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे.
ही माहिती मिळताच आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास घेतला आहे. तसेच दिल्ली सह संपूर्ण भारत भर आप च्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करत जागोजागी लाडू, पेढे वाटप केले. जरी काही अटी सह जामीन मंजूर झाले असले तरी अरविंद केजरीवाल त्यांच्या कार्यालयात जाऊ शकत नाही कि फाईल्स वर सह्या करू शकत नाही.मात्र विरोधी पक्षात तसेच इंडिया आघाडीत ही आनंद व्यक्त होत आहे.