प्रतिनिधी :सुरेश बोरले
मुंबई,राजकारणामध्ये कुणाची विकेट कधी पडेल हे सांगता येत नाही.महाराष्ट्राच्या स्थानीक संघटने मध्ये मोठी फूट पडली, पितामह स्वर्गीय, बाळासाहेब साहेबांनी जो महाराष्ट्र पाहिला होता, त्यांनी भूमिपुत्र एक संघ केले. त्यांना मुंबईत जगण्याचा मार्ग दाखवला, अनेकांना पोटा पाण्याला लावले. माननीय, बाळा साहेब ठाकरे! म्हणजे छत्रपती! त्यांच्या समवेत असणारे,मावळे होते.त्या मध्ये सर्व, मनोहर जोशी,सुधीर जोशी,वामनराव महाडिक,दत्ताजी साळवी आणि कित्येक हे हुकुमी एक्के होते !बाळा साहेबांच्या पश्चात सगळ्या गोष्टी थंड पडल्या.ज्यांनी बाळासाहेबांना हिंदुरुदय सम्राटस मानले व स्वर्गीय,आनंदी दिघे यांना धर्मवीर मानले, त्यांनीच शिवसेनेला मोठे खिंडारही पडले,ही खेदाची गोष्ट आहे. पण नियतीचे हे चक्र कधीही केलेल्या कर्मावर, अवलंबून असते.तर आपली कर्म चांगली व समाजोपयोगी असतील तर आपल्याला चांगली प्रचिती येते. जर त्यामध्ये गद्दारी,बेइमानी असेल,तर त्याची प्रचीती त्याला भोगावी लागते. आताच एका शहाण्याचं घ्या ना! जगाच्या मागे हातोडा घेऊन माणूस,मीडिया समोर ,सर्वांना आव्हान द्यायचा,! पण ते काम त्याने आपल्या स्वतःच्या हिमतीवर व कर्तुत्वावर, केले असते,तर प्रचिती ही चांगली झाली असती. पण एका पक्षाच्या सहकार्याने, कोणाच्या इशाराने!हे कुकर्म केल्याने, तो हातोडा तर आता त्याच्यात मागे हात धुवून, लागलेला आहे! हे विशेष. त्यांनी जर का भूमिपुत्र दुखावलं, तर त्याची वरात हमखास निघणार! आहे हे नक्कीच. हा जनतेचा कौल आहे. यामध्ये जर का भूमिपुत्रांच्या महिलांचा अपमान केला असेल तर मात्र त्याची खेळ खल्लास . तो माणूस मोकळेपणाने फिरू शकत नाही. किती वर्ष अजून त्याला संरक्षण मिळणार? कधीतरी मोकळा होणार ना?मग पाहू हे जनमत आहे. त्या माणसाची क्लिप विधान भवनाथ अध्यक्षांना दिलेली आहे. त्यामुळे जर का त्या महाशयांनी मराठी महिलांचा अपमानबकेला असेल,तर मात्र त्याची खैर नाही.अशी चर्चा सद्या जन मानसात होत आहे. आणखी किती दिवस चुग्ल्या करणार? असो, त्याच्या कर्माचे फल येथेच त्याला भोगायचे आहे, हे निश्चित. भगवान के घर देर है, अंधेर नही! आता अलि बाबाच्या गुहेत विशेष अधिकृतपणे दहाहून अधिक आमदारांनी नागपूर वाल्यांच्या गटात प्रवेश केलेला आहे.ते त्या 40सोंगाड्यांच्या पुढेही निघून गेलेले आहेत. कारण त्या छोट्या गटात राष्ट्रवादीच्या अध्यक्षांचा, पुतण्या त्यांच्या गळाला लागला आहे. तो ह्या 40 छोट्या माशांना घेऊन गिळून टाकणार निश्चित. कर्माची फळे येथेच भोगायची आहेत.हे निश्चित! कारण पुतण्या अतिशय चाणक्य व हुशार आहे. आता लवकरच मुख्यमंत्र्याच्या खुर्चीला ही,सुरुंग लागेल,
भूस्खलन, भूकंप,दरर्डी कोसळणार!ही प्रकरण राजकारणात, जनतेला पाहायला मिळतीलच.आता तर कोकणच्या प्रतिनिधी साठी, महाडचे आमदार झगडत आहेत हे हास्यस्पद आहे. कुठे स्थानिक पक्षात असताना त्यांची वट?आता छोट्या पदासाठी त्यांना संघर्ष करावे लागत आहे , 40 सवंगड्यांचे धाबे आता दणाणलेले आहेत. कारण 10जणांचा नेता ,हा अतीशय हुशार आहे.हे ते नक्कीच ते जाणून आहेत. पण काय ते डोंगुर काय ते हटेल,काय ती नदी! असे विधान करणारे, तुम्ही काय जनतेची कामे कराल? जे निश्चित होते?40जणांची आपसात कुजबूज नक्की आहे. पण आता सहन होत नाही, सांगता येत नाही! संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही? इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती लवकर निर्माण झाली आहे. केंद्रातील बुद्धिमान माणसे हे कोंबडए व रेडे झुंजवत आहेत. त्यांना माहित आहे. दोघांचे भांडण तिसऱ्या चा लाभ! हा होणार आहे. येणारा काळ हा 40जणां साठी अतिशय कर्दन काळ ठरणार आहे, हे निश्चित.आपण होतो त्या ठिकाणी चांगला होतो आणि असे त्यांना वाटेल. पण ती वेळ निघून गेलेली असेल, इमानी पणा व बेइमानी याची किंमत काय असते,हे त्यांना लवकरच कळेल. कारण त्यांच पक्षांतर झाल्यावर नुसती गंमत जंमत चाललेली आहे,असे दिसते. सामाजिक कामे फक्त मुख्यमंत्रिच करताना दिसतात. प्रत्येक ठिकाणी दान देत सुटले आहेत. अहो साहेब! हा जनतेचा पैसा आहे? आधीच राष्ट्र कर्जबाजारी आहे, याची जाण तरी ठेवा! चुकी कोणाची आहे घटनेमध्ये,हे पाहायचं नाही, फक्त पैसे जाहीर करायचे, हा खेळ जनता जाणते. पण शेवटी चाट जनतेलाच पडणार?एकंदरीत राष्ट्रवादीच्या, या प्रवेशाने तंबू मे घबराट आहे हे लोकांना कळलेला आहे. लोकं फक्त शेवट होण्याची वाट पाहत आहेत. जनतेची सामाजिक कामे राहिली बाजूला फक्त पक्षांतरा मध्ये महाराष्ट्राचा वेळ चाललेला आहे.चहापान, खान पानवर, बहिष्कार! ह्याच वेळ चाललेला आहे.कार्यसिद्धी कुठे होताना दिसत नाही, त्यामुळेच महाराष्ट्र पिछाडीवर पडणार आहे. मला फक्त मंत्रीपद द्या नाहीतर चांगलं खात द्या! यावर 40लोकांचा डोळा आहे. आता तर, दहा जणांची दुधात मासे पडलेली आहे, तुमच्यात आहे ताकद, दुधातून अलगत माशी बाहेर काढायची. आहे का? हे तुम्ही आहेत जाणता. ते आलेले मुरब्बी आहेत. तुम्हाला पूरून उरणार आहेत.हे तुम्हाला ही माहित आहे. म्हणून तर नागपूरकरांनी त्यांना विशेष मान तुमच्या आधी दिला,हे खास आहे. कालच दूरचित्रवाणी वाहिनीवर, एक हिन चित्र पाहिले! कोकणचे माझे शिक्षण मंत्री राष्ट्रवादीच्या पुतण्या ची वाट पाहत, त्यांच्यासाठी उभे राहिले होते.गाडी आल्यावर, त्यांच्याकडे त्यांना ढुंकुंनही पाहिले नाही, हे निश्चित.शेवटी महाशयांना, त्यांच्याकडे वाट काढून जावे लागले.ही वादळापूर्वीची नांदी आहे. हे जनता जाणून आहे. येणाऱ्या काळात महाराष्ट्रात राजकारणात मोठे भूकंप होणार आहेत. लावा कुणा कुणाला घेऊन जाईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे पन्नास खोके एकदम ओके! यात कितपत सत्यता आहे, हे घेणाऱ्याला व देणाऱ्याला माहित.
हे जनतेलाही कळायला हवं? ही त्यांची मनोकामना आहे.कारण या गदारोळात,जनतेची कामे होत नाहीत, ही खंत जन मनासात आहे, हे निश्चित.
Alibaba10 plus minus chor