लेखक :सुरेश बोरले.

File photo
लहानपणा पासून सिनेमाचं आकर्षण हे भारी होत.त्या काळी तिकिटांचे दर किलोच्या भावाने होते.वडील पैसे द्यायचे,मग मी सकाळी लवकरच तिकीट खिडकीवर जाऊन उभा!तेही हाफ चड्डीत.त्या गमती जमती त्या आठवणी कमी नाहीत. त्याकाळची गाणी आजही,दूरचित्रवाणीवर एफ एम वर ऐकताना,त्या सुवर्ण युगात गेल्याशिवाय मन रहात नाही.अश्या ह्या गायकांचा आवाज आजही कानात घुमट आहे.लाहानपणी काय कळत नव्हतं!पण आता त्या कलेची जाण समजते. लहानपणी आपण गाणी मौज म्हणून ती ऐकायचो, आता कला म्हणून तेथे पाहतो.अशाच एक गायिका स्व.गीता दत्त.
गीता दत्त,पूर्वश्रमीच्या गीता रॉय,जलमाने बंगाली भाषिक होत्या.त्यांचा जन्म फरिदपुर येथे 1930 साली झाला.1942 साली त्या बारा वर्षाच्या असताना,त्यांचे वडील बंगाल मधून मुंबईला स्थायिक झाले.दादर येथील त्यांच्या घरि ह्या छोट्या बालिकेला स्व.संगीतकार,हनुमान प्रसाद यांनी सहजपणे गाताना पाहिले.तिचा आवाज त्यांना गोड वाटला.म्हणून गिताजिंना,त्यांनी1946 साली,ते संगीत बध्द करीत असलेल्या,भक्त प्रल्हाद!या चित्रपटात त्यांनी लहान मुलान बरोबर, गायला दोन ओळींची संधी दिली.ह्याच दोन ओळी त्यांच्या कलेची नांदी ठरली.त्या दोन ओळी ध्वनिमुद्रित ऐकलयावर.लोकांनी उभे राहून टाळ्या वाजवल्या.याचा परिणाम त्यांच्या फिल्मी गायकीवर झाला.मग 1947 साली,भक्ता प्रल्हाद च्या दोन ओळी नंतर, तडक त्यांचा दूरध्वनीवर पत्ता घेऊन,हनुमान प्रसाद!त्यांच्या घरी गेले.गिताजिना त्यांनी दोभाई ह्या सिनेमासाठी,मोठी संधी दिली.त्यांचं पहिलं गीत मेरा सुंदर सपना बित गया !हे खूपच गाजले.येथूनच खरा त्यांचा फिल्मी प्रवास सुरू झाला. 1947–49 क्या दशकांत,गिताजी फिल्मी जगतावर छावून गेल्या.1949 ह्या दशकांत बरसात,अंदाज आणि महल हे तिन्ही चित्रपट लोकप्रिय ठरले.हे चित्रपट एका पेक्षा एक होते.हा सुवर्ण काळ त्यांनी गाजवला.पण आयेगा आयेगा!ह्या लताजिनी गायलेल्या ह्या गाण्याने मात्र त्यांना आव्हान मिळाले.लता दीदींच्या ह्या गीताने फिल्मी जग हलून गेले.1950 व्या दशकांत,लताजीनी फक्त दोन गायिकाना समांतर ठेवलं,त्या म्हणजे, स्व.शमशाद बेगम व स्व. गीताजी ह्यांना.परंतु त्या दोघीही दुय्यम राहिल्या.फक्त गिताजिनी आपला पाढा 10 वर्ष दिदिन बरोबर टीकवला.ही एक मोठी गोष्ट आहे.
1951 साली आपला मोर्चा गीताजीने भक्ती संगीताकडे वळवला.एकंदरीत 12 लोकप्रिय भजने त्यांनी गायली.तर त्यात फिल्मी दुखी गाणीही गायली होती.हॉलिवूडचा सब्ली करण्याचा प्रयत्न,चित्रपटात झाला.त्यात स्व.गिताजीनी, जाझ संगीतात गायलेली गाणी,तर लाजवाब च होती.त्यांची ह्या तालावर ची गाणी लाजवाब होती.पश्चिमात्य संगीताची लय त्यात होती.त्यांच्या ह्या गाण्यांनी,चित्रपटांची उंची वाढली.एका पेक्षा एक गाणी होती. नवक्या वाहिदाने तकदिर से बिगडी ह्या गाण्यावर कहरच केला.ही एक गजल होती.ती चांगल्या गाण्यात बदलली.प्रत्येक क्लबच्या मंचावर ह्या गाण्याची रेलचेल होती. सगळ्यांची पसंद म्हणजे गीता रॉय.त्यावेळी चित्रपट निर्माता व दिग्दर्शक स्व.गुरुदत्त यांच्या बरोबर त्यांची जोडी जमली.दोघांनी 1953 साली,विवाह केला.आपल्या पतीच्या सिनेमात त्यांनिअप्रतीम गाणी गायली,तीन मुलेही त्यांना झाली.
परंतु 1957 साली,ह्या सुंदर जोडप्याला दृष्ट लागली.गुरू दत्त ह्यांच्या जीवनात अभिनेत्री वहिदा रेहमान ह्यांनी प्रवेश केला.ह्याच कारणासाठी,गिताजिनी आपल्या मालकाक्या मर्जीने वहिदा साठी, जबरदस्तीने गाणीही गायली.येथेच त्यांचे समंध दुभंगले.त्याने गिताजिंच्या गायिकेचा तडा गेला.त्यावेळी पहिला गौरी सिनेमा स्कोप,चित्रपट 1957 साली भारतात,गुरुदत्त ह्यांनी करण्याचा प्रयत्न केला,पण तोही फोल ठरला.कारण तो चित्रपट अर्ध्यावरच रखडला न बंद पडला.त्याचवेळी गिताजिंविरुद्ध,गाण्याची तक्रार करण्यात आली,ध्वनी मुद्रण आणि सरावासाठी त्या वेळ देत नाहीत.कौटुंबिक कलह व पती विरह ह्याने त्यांची कलेवरची पकड सुटली.त्या मध्यपी बनल्या.
1954 साली,गुरुदत्त यांचे निधन झालं.वाहिदही लांब झाली.परंतु गिताजी व गुरू दत्त पुन्हा एकत्र कधी आलेच नाहीत.गिताजिंचे जीवन आधीच दुःखी,त्यात पतीच निधन,त्या आणखीनच खचल्या.त्यांची गायकिही पूर्वीसारखी राहिली नाही.त्याच वेळेला त्यांची जागा लता दीदींच्या कनिष्ठ बहिणीने,अर्थात अशाजिने घेतली.कारण त्याची गायकी,गिताजिंसारखीच होती.त्यांनी गितज्जिना मागे टाकले.अशा अनेक घटनांनी,त्यांचे जीवन नैराश्यमय झाले.त्यामुळे त्यांना आर्थिक चण चण भासू लागली.त्यातूनही त्या सावरल्या पण उशीर झाला होता.पुन्हा त्यांनी गायकीचा प्रयत्न केला,बाहेरही कार्यक्रम केले.दुर्गा पूजेला गायच्या,!बंगाली सिनेमा बधू भरन 1967 साली मुख्य भूमिकाही केली.परंतु शरीर साठ देत नव्हतं.अती मध्य पिण्याने शरी जर्जर झाल होत.आशाही परिस्थितीत त्यांनी 1971 साली अनुभव ह्या सिनेमात गायल्या.अती मध्यापान या कारणाने त्यांना यकृताचा रोग झाला.1972 साली त्यांचे निधन झाले.
परंतु त्यांच्या गाण्याची धार व लकब ही वेगळीच होती.त्यांनी आपली गाणी जीवन रस ओतून गायलेली आहेत.अशा या गायीके ला तिने सिने जगताच्या केलेल्या सेवेला मानाचा मुजरा!