आंतरराष्ट्रीय घरेलू कामगार दिन कामगार आयुक्त कार्यालय येथे साजरा…

Share

प्रतिनिधी :उत्कर्ष बोर्ले

मुंबई:”आंतरराष्ट्रीय घरेलू कामगार दिवस अनोख्या पद्धतीने साजरा” आंतरराष्ट्रीय घरगुती कामगार दिवस”. हा दिवस दरवर्षी 16 जून रोजी साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश घरगुती कामगारांच्या हक्कांबद्दल जागरूकता वाढवणे आणि त्यांना सन्मान देणे आहे. हा दिवस घरगुती कामगारांच्या योगदानाला आणि त्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या प्रयत्नांना समर्पित आहे. 

2011 मध्ये, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने (ILO) घरगुती कामगारांसाठी (convention 189) मंजूर केले, ज्यामुळे हा दिवस साजरा करण्याची प्रथा सुरू झाली.हा दिवस घरगुती कामगारांच्या हक्कांसाठी आवाज उठवतो आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. म्हणूनच महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वयक समिती व कामगार एकता युनियन अमित गवळी ,तसेच युनियन प्रतिनिधी पंचशीला, शकुंतला, इंदुबाई, वैशाली,शोभा ताई,पूजा, द्म्यंती ताई यांच्यावतीने आज बांद्रा कामगार भवन कामगार आयुक्त कार्यालय या ठिकाणी साजरा करण्यात आला. यामध्ये घरेलू कामगारांनी त्या ठिकाणी जमा होऊन आपल्या हक्काविषयी आपल्या मागण्याविषयीची निवेदन सहाय्यक आयुक्त यांना दिले त्याचबरोबर लवकरात लवकर कोर्टाने दिलेल्या आदेशाचे पालन करून देशपातळीवर घरेलू कामगारांसाठी कायदा तयार करावा ही देखील मागणी समोर ठेवण्यात आली यामध्ये मुंबई उपनगर मधील अधिक तर महिला भर पावसामध्ये भिजत कार्यालयावरती पोहोचल्या व त्यांनी आपल्या मागण्या घोषणा देऊन निवेदन देऊन आयुक्तांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला त्यांना आशा आहे की लवकरच त्यांच्यासाठी आशेची किरण उमलेल व त्यांच्या मागण्या मान्य होऊन त्यांना न्याय मिळेल. काही मुख्य मागण्या घरेलू कामगार कल्याण मंडळ कायदा सक्षम करा !,29 जानेवारी 2025 रोजीच्या मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करा व घरेलू कामगारांकरीता देशव्यापी कायदा करा !

या दोन मागण्यांवर घरेलू कामगारांनी अधिक भर देऊन मांडणी केली.


Share

One thought on “आंतरराष्ट्रीय घरेलू कामगार दिन कामगार आयुक्त कार्यालय येथे साजरा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *