
प्रतिनिधी : वैशाली महाडिक
चिपळूण :गोसावीवाडी येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सुनीता परशुराम पवार वय 65वर्षे यांची निर्घृण हत्त्या त्यांचा शेजारी मुंबईतील बेस्ट उपक्रमातील चालक स्वप्नील खातू याने दि. 27 ऑगस्ट 2024 रोजी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
सुनीता पवार या पती परशुराम पवार सोबत गावात राहत होत्या. त्यांचा मुलगा सतीश पवार हा मुंबई पोलिस दलात कार्यरत आहे. दि.27 ऑगस्ट 2024 रोजी ही घटना घडली. सुनीता पवार यांचे पती गावात दहीहंडी उत्सव असल्याने गावी गेले होते. सुनीता पवार या घरात एकट्या होत्या. सायंकाळी घरी परतल्यानंतर घरात अंधार असल्याचे पाहून पती परशुराम पवार घाबरले. व त्यांनी लाईट लावताच त्यांची पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. हादरलेले पवार यांना कळेना काय करावे मात्र थोडं स्वताच सावरून त्यांनी स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला व त्यांना घटनेची माहिती दिल्यावर सावर्डे पोलिसांनी तत्परता दाखवत ही घटनेचे गांभीर्या लक्षात घेत आरोपी स्वप्नील खातू याला चोवीस तासांच्या आत श्वनाच्या मदतीने जेरबंद केले .आरोपी स्वप्नील खातू हा मुंबईतील घाटकोपर येथे राहत होता. तसेच बेस्ट चालक म्हणून काम करत होता. जन्माष्टमीनिमित्त किरकोळ वादातून घरी आलेले भरलेले सिलिंडर स्वप्नील ने सुनीता पवार यांच्या डोक्यात घातले हा घाव इतका गंभीर होता कि सुनीता पवार यांचे डोके फुटून त्या जमिनीवर पडल्या. या नंतर स्वप्नील खातू ने आपले कृत्य लपवण्याच्या व ही घटना चोरीच्या उद्देशाने झाल्याचा बनाव करत मयत सुनीता यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरून घटनास्थळावरून पळ काढला होता.
सुनीता पवार यांच्या हत्येमुळे घरात शोकाकुल वातावरण आहे.मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेला मुलगा सतीश पवार याने आरोपी स्वप्नील खातू याच्या वर कठोर कारवाई ची मागणी करत अनधिकृत बंगल्याच्या बांधकामावर बुलडोझर फिरवण्याची ही मागणी मुख्यमंत्री, गृह मंत्री आणि रत्नागिरी जिल्हाचे पालक मंत्र्या सह रत्नागिरी जिल्हाधिकारी, तसेच पोलीस अधीक्षक रत्नागिरी जिल्हा यांच्या कडे केली आहे.
सामान्यांच्या रक्षणासाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांच्या माता बघिणी जर सुरक्षित नसतील तर मग राज्य शासन आणि प्रशासन काय करतय असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. तसेच जर पोलिसांचे कुटुंबीयच जर सुरक्षित नसतील तर मग त्यांनी करायचे काय??
