
प्रतिनिधी :सुरेश बोरले
मुंबई,आपल्या फिल्मी जगताचा 1965 च्या आसपासचा काळ सुवर्ण काळ होता. चित्रपट पाहण्याची धुंद त्या वयात होती. त्यावेळी एक कुतूहल होतं. रेडिओ कसा वाजतो! त्या बॉक्समध्ये लहान लहान माणसं आहेत का? अशी माझी बाल कल्पना होती.गल्लीत सणासुदीला 16 एम एम पडद्यावर गल्लीत चित्रपट पाहण्याची मजा काय औरच होती. त्या वेळचे कलाकार ही बालमानावरती परिणाम करून जायचे.मग तो मुख्य नट असल्यास,आवडायचा.कारण शेवटी खलनायकालाही बदडून काढायचा किंवा पोलिसांच्या ताब्यात द्यायचा. किंवा त्या खलनायकाचा खात्मा करायचा. हास्य कलाकार पोट धरून हसवायचे म्हणून ते आवडायचे. पण खलनायकाला पाहिल्यावर तीटकारायचा यायचा.खल नायकाची बालपणाची क्रूर माणूस म्हणून मनावर छबी रंगलेली होती.ती अनेक वर्षे मन पटलावर कोरलेली होती.असाच एक उंचापुरा खलनायक होता शरीर यष्टी मजबूत व चेहऱ्यावर देवीची व्रण! त्यामुळे तो आणखीनच क्रूर दिसायचा. तो खलनायक,अंगावरती काळा कोट, काळी पॅन्ट, काळी हॅट, हातात काळे हातमोजे, तोंडात मोठी सिगार व त्यातून निघणारा सफेद धूर, शिवाय डोळ्यावरती काळा गॉगल, असा भयानक पोशाख घालून तो खलनायक अंधेऱ्या रात्री यायचा आणि पाठीमागून कॅमेरा व भरगच्च प्रकाश, भयानक आकृती दिसायची आणि अचानक त्याच्या चेहऱ्यावर कॅमेरा फिरवताच तो भयानकी चेहरा दिसायचा. तोच भयानक चेहरा म्हणजे बुलंद खलनायक स्वर्गीय.शेख मुख्तार! स्वर्गीय शेख मुख्तार यांचा जन्म २४, डिसेंबर १९१४रोजी दिल्लीच्या चुडी वाला गल्ली जामा मज्जिदच्या परिसरा समोर झाला. त्यांचे वडील चौधरी स्वर्गीय.अश्फाक अहमद रेल्वे पोलीस निरीक्षक होते त्यांचा जन्म कराची ब्रिटिश प्रांतात पाकिस्तानचा.पण काही घटना घडल्यावर त्यांची बदली दिल्ली येथे झाली, मग ते कुटुंबासोबत दिल्लीतच वसले. मुख्तार साहेबांचा शिक्षण इंडियन अरेबियन स्कूल अजमेरी गेट दिल्ली येथे झाले. त्यांचे वडील पोलीस खात्यात असल्यामुळे आपल्या मुलानेही पोलीस किंवा सेनादलात मोठ्या हुद्द्यावर काम कराव, आस त्यांना वाटे.परंतु मुक्तार यांना नाट्य मंडळ सिनेमाचे आवड होती.त्यांच्या परिसरातील मित्रा बरोबर ते नाटक कंपनीत कामाला लागले. त्यासाठी त्यांनी कलकत्ता गाठले सहा फूट दोन इंच उंचीच्या भारदस्त अशा या माणसाने अनेक चित्रपटात कामे केली. त्यातील काही चित्रपट ऐतिहासिक होते. प्रत्येक चित्रपटात त्यांनी एक जबरदस्त खलनायक पेश केला. कलाकारासोबत ते निर्माताही होते त्यांनी 1957 च्या दशकात नूर्जहान चित्रपट काढला. परंतु तो चित्रपट बऱ्यापैकी आपटला. त्यामुळे ते निराश झाले त्यांच्या वेळेस त्यांच्या मजबूत शरीराला शोभणारा नट मिळत नव्हता,मग त्यांच्या तोडीस तोड हिंदकेसरी वादळ स्वर्गीय.दारासिंग त्यांच्याबरोबर त्यांची जोडी जमली. त्यांचा सोबत त्यांनी चित्रपटात, खलनायक पेश केला लोकांना तो आवडला. कारण त्याकाळी मारधाडीचे सिनेमे असायचे. शेख मुख्तार यांचं वास्तव्य वडिलांच्या निवृत्तीनंतर, डोली खाल उत्तर प्रदेश येथे होतं. परंतु चित्रपट दुनियेच्या लालसेने, ते मुंबईत आले व आपली मनिष्या पूर्ण केली. पण शेवटी त्यांनाही फिल्म निर्माण करण्याची इच्छा झाली. त्यांनी स्वर्गी. मीना कुमारी यांना घेऊन वरील चित्रपट काढला, तो चित्रपट दुर्दैवाने पडल्याने,ते हवालदील झाले. त्यांचे मन येथे रमले नाही. पुन्हा ते पाकिस्तान कराची येते परतले. उतार वयात त्यांना अनेक रोगांनी ग्रासले. त्यामुळे त्यांची दृष्टी लोप पावली. अशा अवस्थेत 1980 मध्ये त्यांचं कराची येथे देहवासन झालं. त्यांनी केलेल्या भारतीय चित्रपट दुनियेच्या निस्सीम सेवेला,आमचा सलाम.