प्रतिनिधी :मिलन शहा
कामगार क्षेत्र : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) सोमवारी झालेल्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या (CBT) बैठकीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार, कर्मचारी आता कोणतेही कागदपत्र सादर न करता आपल्या ईपीएफ खात्यातील संपूर्ण रक्कम काढू शकतील.
केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत कर्मचाऱ्यांना दिलासा देणारे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
या निर्णयामुळे नोकरदार वर्गाला आपल्या पीएफ खात्यातून पैसे काढणे अधिक सुलभ आणि वेगवान होणार आहे.
Ohh nice