
प्रतिनिधी :उत्कर्ष बोर्ले
मुंबई: नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईत अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे स्वागत केले गेले.
गोरेगाव पश्चिम येथील आदर्श विद्यालय शाळेत सुद्धा कार्टून विश्वाचे कॅरेक्टर छोटा भीम च्या मॅस्कॉटने विद्यार्थ्यांचे स्वागत केले. टीव्हीवर दिसणारा कल्पनेतील छोटा भीम प्रत्यक्षात आपले स्वागत करताना पाहून प्राथमिक विभागातील बच्चे कंपनी खुश झाली. पहिल्या वर्गात पहिल्यांदाच प्रवेश करणाऱ्या बालकांसाठी हा अनुभव विशेष आनंददायी होता.
छोटा भीम ने मुलांना शुभेच्छा दिल्या आणि शाळेतील शिक्षकांचे आशीर्वाद घेतले.
शिक्षकांच्या गमतीशीर प्रश्नांना छोटा भीमने सुद्धा तशीच गमतीशीर उत्तरे दिली. त्यामुळे शाळेचा पहिला दिवस आदर्श विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरला.
ही कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा शोभणे व माजी विद्यार्थिनी स्मृती शैलेश सावंत-मथुरे यांनी विशेष सहभाग घेतला.
मसत मज्जा