
प्रतिनिधी:सुरेश बोरले
मुंबई लोकसेवा करण्याची मनाची सदिच्छा लागते व आवड लागते.या सगळ्या गोष्टी अंतर मनापासून व्हाव्या लागतात. या वरील सगळ्या गोष्टींचा मनोमिलन झाल्यावर हळूहळू माणूस या क्षेत्रात चंचु प्रवेश करतो व झेपेल तेवढी छोटी मोठी कामे करून, तो आपला पाय मजबूत करतो. पण ही लोकसेवा करताना माणसाला मात्र जनसेवेसाठी नियमित सतर्क तयार रहावे लागते.कारण एकदा का लोकांना माहित पडले की ही व्यकती लोकांच्या समस्या सोडवते, मग त्या माणसाकडे समस्या असणाऱ्यांची चेनच मागे लागते.रात्री अपरात्री,त्या सज्जनास तयार राहावे लागते. वेळ पडल्यास आपले घर विसरावे लागते.तेव्हा त्याचे परिवर्तन समाजसेवक या रूपात होते. मग त्याला जनमानसातन, राजकीय माणसांनाकडून,मान मिळतो.पण त्यासाठी अनेक खस्ता खाव्या लागतात, वेळ पडल्यास आर्थिक फटकाही बसतो.असाच एक समाजसेवक गोरेगाव पूर्वेला पठाण वाडी,बडी मज्जिद समोरच्या विभागात रहात आहे,उंच पुरा व नेहमीच कुणाला मदत करण्याच्या तयारीत, कोणत्याही कामाचा मोबदला न घेता,निस्वार्थी कामे लोकांची करीत आहे.राजकारणात त्याची चांगली ओळख आणि त्याला मान सन्मान आहे.राजकारणात तो पदाधिकारीही आहे.असा वल्ली समाजसेवक म्हणजेच श्री,सलीम भाई भाटी. मी एका ठिकाणी सेवेला असताना,त्यांचा संबंध आला व ते मित्र बनले. पण त्यांच्या मागची पार्श्वभूमी मला माहित नव्हती?पण त्यांच्या सामाजिक कामाचा प्रत्यय मला नंतर बऱ्यापैकी आला. सलीम भाई म्हणजे एक आकर्षक व्यक्तिमत्व, त्यांच्याकडे कोणती समस्या घेऊन जा! तुम्हाला ते तन मन धनाने ती समस्या सोडवण्याचा करण्याचा प्रयत्न करणार, अशीच समस्या आमच्या कामावरील सोबतच्या कर्मचाऱ्यांना आली होती, त्यांनी सलीम भाईंना विनंती केली, त्वरित एका मंत्र्यांबरोबर बोलणी करून.त्यांनी ती समस्या सोडवली.सांगायाच विशेष म्हणजे, ती समस्या मुंबईच्या बाहेरची होती. माझी हि एक समस्या होती,त्यावेळेसही त्यांनी ताबडतोब ती समस्या सोडवली. या प्रत्यक्ष अनुभवाने त्या माणसाची काम करण्याची व्याप्ती व चिकाटी समजते. आज पठाण वाडी त बडी मज्जिद च्या आसपास आपण सलीम भाटी कुठे राहतात विचारलं, तर आपल्याला त्वरित ती व्यक्ती, ते ज्या ठिकाणी इमारतीत राहतात ती इमारत आदराने दाखवते. पठाण वाडी, दिंडोशी, कुरार विलेज, आप्पापाडा पर्यंत त्यांचा दबदबा आहे. एक अवलिया व्यक्ती म्हणून त्यांची ख्याती आहे. सामाजिक काम करताना ते जात-पात धर्म पाहत नाहीत, मानवतावादी हाच त्यांचं धर्म आहे.सलीमभाई हे राजकारणातही सक्रिय आहेत. ते स्वर्गीय,मृणाल गोरे ह्यांच्या समाजवादी जनता दल, या पक्षात बरोबर जवळ जवळ 35 वर्ष सक्रिय आहेत.त्या पक्षात कामे करताना त्यांनी अनेकांना न्याय दिलेला आहे.अनेकांच्या समस्या सोडवल्या आहेत. एवढ्या मोठ्या अनुभवाने, त्यांनी अनेक दिग्गजान त्याचबरोबर,त्यांच्या मांडीला मांडी लावून काम केलेली आहेत. त्यामध्ये वी पी सिंग,मधु दंडवते,चंद्रशेखर, देवेगौडा के गुजराल अशी नामांकित यादी आहे. आता ते आपल्या पक्षाचे मुंबई कार्यकारी अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे कार्यवाह आहेत. ह्या पदापर्यंत पोहोचणे हे सोप्प काम नाही. त्यांनी आपल्या परिसरात दिवस सत्र कामे केलेली आहेत.
लोकांच्या समस्या सोडवलेल्या आहेत.आता तर ते किसान संघ समितीचे राष्ट्रीय संघटक मंत्री व महाराष्ट्र प्रदेश प्रभारी आहेत. त्यांच्या कामाचा कल पाहून त्यांना ही पदे देण्यात आलेली आहेत. त्यांची वरणी आता राष्ट्रीय उपाध्यक्ष या पदावर लागलेली आहे. सदर पद त्यांना मोठ्या हीकमतीने दिल्यावर,त्यांनी आपलं मनोगत अशा प्रकारे व्यक्त केले आहे की, माझ्यावर मोठी जबाबदारी दिलेली आहे.त्यामुळे मी शेतकरी व मजुरांना त्यांचा अधिकार व न्याय देण्यासाठी निरंतर प्रयत्न करेन! तसेच त्यांना सन्मान देण्यासाठी कोणताही भेदभाव, अन्याय, करणार नाही.तसेच त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचार व शोषणाविरुद्ध, संघर्ष करून त्यांना मदतीसाठी सदैव तत्पर असेन. म्हणजेच सलीम भाई यांच्यावर मोठी जबाबदारी पडलेली आहे. शेतकरी व मजूर विकासाची जबाबदारी त्यांच्यावर पडलेली आहे. हे काम पार करण्यात ते यशस्वी होतील. यात शंका नाही.समाजसेवा करण्याची मोठी इच्छा आणि तयारी व लोकांचं आशीर्वाद!हा त्यांचा कामाचा आढावा आहे.कारण त्यांच्या कामाची व्याप्ती इतकी मोठी आहे की गोरेगावच्या विभागात कल, क्रीडा, सामाजिक कामाच्या गुणगौरव मंचावरती ते नेहमी असतात,त्यांचा सत्कार होतो. त्यांच्या हस्ते!कला, क्रीडा व सांस्कृतिक कामाचे उद्घघाटनही होते. तथा ते कार्यक्रम यशस्वीपणे पार पडतात.हे विशेष! जन माणसाकडून त्यांची राष्ट्रीय पातळीवर आणखी मोठ्या पदावर वर्णी लागावी अशी अपेक्षा आहे.लोकांना त्यांना राष्ट्रीय स्तरावर सामाजिक कामे करताना पाहायचा आहे. अशा या कट्टर सामाजिक कार्यकर्त्याला येणाऱ्या काळासाठी, मनापासून हार्दिक शुभेच्छा!