आदित्य ठाकरेंची बाबा साहेबांना आदरांजली!!

Share

एसएमएस -प्रतिनिधी -मिलन शहा.

मुंबई: महापरिनिर्वाण दिनानिमित्त युवासेना प्रमुख व शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी वरळीतील आंबेडकर भवन ट्रस्ट येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी त्यांनी तथागत गौतम बुद्धांचेही दर्शन घेऊन मानवतेच्या, समतेच्या आणि बंधुतेच्या मूल्यांना सलाम केला.

या कार्यक्रमाला शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर, आमदार सुनील शिंदे, पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.


Share

One thought on “आदित्य ठाकरेंची बाबा साहेबांना आदरांजली!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *