
प्रतिनिधी :उत्कर्ष बोर्ले
मुंबई : नुकतेच नामदेव शिंपी समाज डोंबिवली च्या महिला मंडळाच्या वतीने अध्यक्षा स्वाती हिरवे, यांच्या मार्गदर्शनाखाली जान्हवी माळवदे, सीमा पुकाळे, दिपाली अवसरे, विद्या ऐतवडे यांनी वांगणी च्या आदिवासी पाड्यावर जाऊन आगळीवेगळी दिवाळी साजरी केली. काही दिवसापूर्वी स्वाती ताई च्या मातृतुल्य वहिनी श्रीमती सुमनताई दिलीप कल्याणकर यांना देवाज्ञा झाली.त्यांच्या स्मरणार्थ आदिवासी मुलांना खाऊ, स्त्रियांना साड्या व फराळाचे पदार्थ, साबण यांचे वाटप केले. सर्वांच्या चेहऱ्यावरील आनंद ही श्रीमती सुमनताई कल्याणकरांसाठी एक वेगळी श्रद्धांजली ठरली. जान्हवी माळवदे यांनी विध्यार्थना व महिलांना शिक्षणाचे महत्व समजावून देत आपल्या पायावर उभे राहून सक्षम बनण्यासाठी मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले. दीपक सारंगा, आप्पासाहेब, सुनिता खळदे,मंजुळा शेट्टी, उमा कार्ले, व पांडुरंग घोडके यांनी विशेष सहकार्य केले.
Good
खुप सुन्दर पुढच्या वाटचाली साठी आणि दिपावली करिता अनेक शुभेच्छा
Very nice
Great