
एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोर्ले
मुंबई: मेट्रो-२ रेल्वे प्रकल्पाचे काम वेगात पुढे चालू असताना, नवीन सुविधांसोबतच सुरू असलेल्या जुनी कामे व देखभाल यावरही प्रशासनाचे लक्ष असावे अशी नागरिकांची मागणी आहे. दहिसर पूर्वेतील आनंद नगर मेट्रो स्टेशनवरील मुख्य सिग्नल जंक्शन जवळ लावलेल्या नावाच्या मोठ्या बोर्डवरील दिवे गेल्या चार महिन्यांपासून बंद असून रात्री बोर्ड दिसत नाही.
एमएमआरडीएच्या जबाबदारीखालील या स्टेशनवरील चारही हॅलोजन दिवे बंद असून दुरुस्तीबाबत अधिकारी निष्काळजी आहेत, अशी तक्रार स्थानिकांनी केली आहे.
स्थानिक सामाजिक कार्यकर्ते राजेश पंड्या यांनी या ठिकाणी “अपर दहिसर” ऐवजी “आनंद नगर” नाव देण्याची मागणी केली होती आणि ती मान्यही झाली. मात्र, आता नावाचा बोर्डच न दिसल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.
“प्रत्येक स्टेशनवर तंत्रज्ञ व कर्मचारी नियुक्त असूनही अशा लहान पण महत्त्वाच्या देखभालीकडे प्रशासन दुर्लक्ष का करते?” असा सवाल राजेश पंड्या यांनी उपस्थित केला.
प्राधिकरणाने दिवे तात्काळ दुरुस्त करून प्रवाशांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
आपल्या समाजात लोकाना घरी बसुन सर्व फुकटचे हवे असते लढाई लढनार कोण चुकिचे कामे दाखवणारे खुप आहे पण लढणारा कोणी नाही
अंधेरा ही अंधेरा
Sad