
file photo
प्रतिनिधी :मिलन शहा
दिल्ली दारू धोरण प्रकरणी संजय सिंह गेल्या सहा महिन्यांपासून तुरुंगात होते. ईडीने त्यांना अटक केली होती. संजय सिंगाच्या जामिनासाठी आज न्यायालयात प्रदीर्घ सुनावणी झाली, ज्यामध्ये संजय यांच्या वकिलांनी न्यायालयासमोर हे तथ्य मांडले की, त्याच्याकडून ना पैसे वसूल झाले आहेत, ना मनी ट्रेल आहे. केवळ एका सरकारी साक्षीदाराच्या जबाबाच्या आधारे त्यांना अटक करण्यात आली होती तर सरकारी साक्षीदार दिनेश अरोरा यांनी मंजूरी देण्यापूर्वी त्याचे नाव घेतले नव्हते. संजय सिंगची पुढील कोठडी घ्यायची असल्यास कोर्टाला कळवण्यासाठी कोर्टाने ईडीला दुपारी 2 वाजेपर्यंत वेळ दिला होता . जेवणानंतर न्यायालय बसले तेव्हा ईडीने जामिनाला विरोध केला नाही आणि सर्वोच्च न्यायालयाने संजय सिंग यांचा जामीन मंजूर केला. संजय सिंह उद्या तुरुंगातून बाहेर येतील.
आप ने x वर ट्विट करत सत्य कि जीत हुई है. असा संदेश दिला आहे. तसेच भाजप चा शडयंत्र नाकामी होणार असल्याचा संदेश जनतेला दिला आहे.