
प्रतिनिधी:वैशाली महाडिक
शांततेत पारपडले आंदोलन !सरकार ला विनंती केली कार शेड इतरत्र हटवण्याची
मुंबई,गोरेगाव येथील आरे कारशेडच्या विरोधात बॉम्बे कॅथलिक सभा च्या वतीने आरेत मेट्रो कारशेड चा विरोध प्रदर्शन करत केलं प्रसंगी बॉम्बे कॅथलिक सभे च्या विविध शाखातून शेकडो नागरिक एकत्रित आरेत आले होते यात महिला आणि पुरुषा सह तरुण तरुणींची ही मोठी संख्या होती.तसेच बॉम्बे कॅथलिक सभे च्या ओरलेम चर्च शाखे च्या वतीने 4 बस भरून लोक निदर्शनात शाखा चेअरमन अँटनी रॉड्रीग्स त्यांच्या नेतृत्वाखाली सहभागी झाले होते.

मालाड हुन बस निघण्या आधी फादर सेड्रिकानी फादर पीटर यांनी आंदोलनाला जाण्या पूर्वी प्रार्थना करत आंदोलन शांततेत करा असा मोला चा सल्ला दिला होता. तसेच बीसीएस ओरलेम शाखेतून अनेक पदाधिकारी अँटनी रॉड्रीग्स ,मेरी चेट्टी, व इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते.
